Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू-indigo pilot dies at boarding gate just before departure at nagpur airport ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Aug 17, 2023 08:32 PM IST

Nagpur news : विमानाचे टेक ऑफ करण्यासाठी निघालेल्या वैमानिकाला बोर्डिंग गेटवरच मृत्यूने गाठलं.वैमानिक नागपूरहून पुण्याला इंडिगो कंपनीच्या विमानाचे सारथ्य करणार होते.

Nagpur Airport 
Nagpur Airport 

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. विमानाचे टेक ऑफ करण्यासाठी निघालेल्या वैमानिकाला बोर्डिंग गेटवरच मृत्यूने गाठलं. वैमानिक नागपूरहून पुण्याला इंडिगो कंपनीच्या विमानाचे सारथ्य करणार होते. मात्र, विमानात जात असताच ते कोसळले ते परत उठलेच नाहीत. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

 कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम असे मृत्यू झालेल्या पायलटचे नाव आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचा अंदाज आहे. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. 

आज सायंकाळच्या सुमारास इंडिगो कंपनीचे विमान नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. या विमानावर कॅप्टन मनोज यांची ड्युटी होती. विमान टेक ऑफ करण्यासाठी ते निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

या घटनेनंतर इंडिगोने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सांगण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाचे निधन झाले आहे. नागपूर विमानतळावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे निधन झाले.

 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या रोस्टरनुसार, आज ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी अनेक विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय,  २७ तासांची विश्रांतीही घेतली. मनोज यांनी बुधवारी, त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटे ३ ते सकाळी ७ दरम्यान विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी २७ तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज नागपूरहून पुण्याकडे विश्रांतीनंतर पहिलेच उड्डाण होते. अशी माहिती समोर आली आहे.

Whats_app_banner
विभाग