मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठी बातमी! मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं ढाक्यात इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!

मोठी बातमी! मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं ढाक्यात इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 13, 2024 10:16 AM IST

mumbai guwahati indigo flight emergency landing : मुंबईहूं गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात बिघाड झाल्याने त्याचे बांग्लादेश येथील ढाक्यात एमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले.

mumbai guwahati indigo flight emergency landing
mumbai guwahati indigo flight emergency landing

mumbai guwahati indigo flight emergency landing : मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे शनिवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. धुक्यामुळे हे विमान आसाममधील गुवाहाटी विमानतळावर उतरू शकले नाही. यानंतर वैमानिकाने हे विमान आसाम शहरापासून ४०० किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या ढाका येथे उतरवले.

चीन, पाकिस्तानला भरणार धडकी! क्षेपणास्त्र डागण्यात माहिर असलेला पहिला स्वदेशी लाईटवेट टँक 'जोरावर' तयार

इंफाळमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणारे मुंबई युवक काँग्रेसचे माजी प्रमुख सूरज सिंह ठाकूर यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये या बाबत माहिती दिली आहे. ते मुंबई ते गुवाहाटी या फ्लाइटमध्ये होते, मात्र, धुक्यामुळे हे विमान वळवण्यात आले आणि ढाका येथे उतरवण्यात आले. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, "मी इंडिगो ६E फ्लाइट क्रमांक ६E ५३१९मधून मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी बसलो. हे विमान गुवाहाटी येथे आले असता, या ठिकाणी असलेल्या दाट धुक्यामुळे ते गुवाहाटीमध्ये उतरू शकले नाही. यामुळे वैमानिकाने हे विमान ढाका येथे उतरले." ते म्हणाले की विमानातील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली.

सूरज सिंह ठाकूर यांनी लिहिले आहे की, प्रवासी अजूनही विमानातच बसले आहेत. गेल्या ९ तासांपासून आम्ही या विमानात अडकलो आहे. भारत जोडो न्याय यात्रेसाठी मी मणिपूर (इंफाळ) येथून रवाना झालो असून आता मी गुवाहाटीला कधी पोहोचणार याची वाट पाहत आहे. विमान ढाक्याला का वळवण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. इंडिगोने या प्रकरणी अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

WhatsApp channel

विभाग