भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड

भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड

Jun 30, 2024 03:27 PM IST

indians spend more than marriages than on education : भारतीय नागरिक शिक्षणापेक्षा लग्नावर सर्वाधिक खर्च करत असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालात पुढे आली आहे. वर्षाला तब्बल १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च लग्नावर होतो.

भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड
भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड

indians spend more than marriages than on education : भारतात विवाह उद्योग अंदाजे १० लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. अन्न आणि किराणा मालानंतर व्यवसायाचे हे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका अहवालात ही माहिती उघड झाली असून यात भारतीय नागरिक शिक्षणाच्या तुलनेत लग्न समारंभांवर दुप्पट खर्च करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भारतीय नागरिक दरवर्षी ८० लाख ते  १ कोटी विवाह होतात, तर चीनमध्ये ७०-८० लाख तर अमेरिकेत २०-२५ लाख विवाह होतात. या विवाह समारंभावर भारतात १० लाख कोटी रुपये खर्च होत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

ब्रोकरेज फर्म जेफरीजने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, "भारतीय विवाह उद्योगाचा आकार अमेरिकेच्या ( ७० अब्ज अमेरिकन डॉलर्स) जवळजवळ दुप्पट आहे. तर चीनच्या (१७० अब्ज डॉलर्सपेक्षा) कमी आहे." अहवालानुसार, विवाहसोहळा उद्योग हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात व्यावसायिक क्षेत्र आहे. तर खाद्यपदार्थ आणि किराणा मालानंतर ( ६८१ अब्ज डॉलर्स) दुसरी सर्वात मोठी उद्योग श्रेणी आहे.

भारतातील विवाहसोहळे हे भव्य असतात. या लग्न सोहळ्यात विविध गोष्टीवर मोठे खर्च केले जातात. यात दागिने आणि पोशाख यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. तसेच वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना देखील या विवाह सोहळ्याच्या अप्रत्यक्षपणे फायदा होतो. लग्नावर कमी खर्च करण्यात यावे यासाठी प्रयत्न होत असतांना देखील भारतीय नागरिक सध्या डेस्टीनेशन वेडिंगवर मोठा खर्च करतांना दिसत आहेत. परदेशात होणाऱ्या या भव्य विवाहसोहळ्यांमधून भारतीयांचे वैभव दिसून येत आहे.

जेफरीज म्हणाले, “दरवर्षी ८० लाख ते १ कोटी विवाहसोहळे होत असतात. भारत हे जगातील सर्वात मोठे वेडिंग डेस्टिनेशन आहे. कॅटनुसार भारतीय लग्न क्षेत्राचे मूल्य अमेरिकेच्या १३० अब्ज डॉलर्स मुलींपेक्षा जास्त आहे. भारतातील लग्न उद्योग अमेरिकेच्या जवळपास दुप्पट आहे. आणि प्रमुख उपभोग श्रेणींमध्ये या विवाहसोहळा उद्योगाचे व त्याच्याशी संलग्न उद्योगांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.”

भारतीय विवाहसोहळे बरेच दिवस चालतात आणि ते अगदी साध्या पद्धतीने तर काही लग्नावर मोठ्या प्रमाणात पैशांची ते उधळपट्टी केली जाते. यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात लग्नावर होणारा खर्च शिक्षणाच्या (पदवीपर्यंत) दुप्पट आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा खर्च शिक्षणाच्या निम्म्याहून कमी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर