Indian Navy Jobs: भारतीय नौदलाने जानेवारी २०२४मध्ये इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला येथे सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावी बीटेक शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅडेट एंट्री स्कीम (कायम आयोग) अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी अर्ज मागवले आहेत.
निवडलेल्यांना एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निकल शाखेच्या चार वर्षांच्या बी.टेक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. एकूण ३० पदांसाठी ही भरती होणार असून यात ९ पदे ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
अर्जदार अविवाहित पुरुष किंवा स्त्रिया असावेत. या पदासाठी पात्र होण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या राष्ट्रीयतेच्या अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. अर्जदारांचा जन्म हा जन्म ०२ जुलै २००४ ते १ जानेवारी २००७ दरम्यान असावा.
अर्जदाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) मध्ये किमान ७० टक्याहून अधिक गुणांसह दहावी आणि १२ वीची परीक्षा (१०+२ पॅटर्न) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा या उत्तीर्ण केलेल्या असणे गरजेचे आहे. या सोबतच इंग्रजीमध्ये किमान ५०टक्के गुण (एकतर दहावी किंवा इयत्ता बारावी) असणे अपेक्षित आहे. अर्जदाराने B.E/ B. Tech साठी JEE (मुख्य) 2023 ची परीक्षा दिली असावी.
वैद्यकीय मानकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कोणत्याही कारणास्तव वैद्यकीय नियमावलीत अर्जदारांना शिथिलता मिळणार नाही.
या भरती प्रक्रियेसाठी B.E/ B. Tech साठी JEE (मुख्य) ऑल इंडिया कॉमन रँक लिस्ट (CRL) - 2023 च्या आधारावर सेवा निवड मंडळ (SSB) साठी कॉल अप जारी केले जाईल. NTA द्वारे प्रकाशित, IHQ MoD (Navy) द्वारे निश्चित केलेल्या कट-ऑफवर आधारित अर्जदार पात्र ठरणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांणा SSB मुलाखती ऑगस्ट 2023 पासून बेंगळुरू/भोपाळ/कोलकाता/विशाखापट्टणम या ठिकाणी बोलावले जाणार आहे. SSB प्रक्रियेचे तपशील भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
SSB मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त असलेल्या उमेदवारांची पोलिस पडताळणी आणि चारित्र्य पडताळणी आणि प्रवेशातील रिक्त पदांची उपलब्धता पाहून नियुक्ती दिली जाणार आहे.
निवडलेल्या उमेदवारांना नौदलाच्या आवश्यकतेनुसार अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील चार वर्षांच्या बी.टेक कोर्ससाठी कॅडेट म्हणून समाविष्ट केले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) द्वारे बी.टेक पदवी प्रदान केली जाईल. कार्यकारी आणि तांत्रिक शाखेतील (अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) कॅडेट्सचे वितरण नौदल अकादमीद्वारे केले जाईल. पुस्तके आणि वाचन साहित्यासह प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च भारतीय नौदल उचलणार आहे. कॅडेट्सना हक्काचे कपडे आणि मेसिंग देखील दिले जाईल.
अर्ज: www.joinindiannavy.gov.in वर ३०.६.२०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या