Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाची पंढरी सजली, मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाची पंढरी सजली, मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट

Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाची पंढरी सजली, मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट

Published Aug 15, 2024 07:51 AM IST

Indias 78th Independence Day: संपूर्ण भारतात आज ७८ वा स्वातंत्र्यदिन धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.

ढरपूरतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंग्याची सजावट
ढरपूरतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंग्याची सजावट

Indian Independence Day 2024: संपूर्ण देशासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवसी ७८ वर्षांपूर्वी भरताने स्वतंत्र मिळवले. स्वातंत्र्यदिन देशातील प्रत्येक नागरिकाला एका नव्या सुरुवातीची पहाट, स्वातंत्र्यसंग्राम, देशासाठी प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि इंग्रजांच्या तावडीतून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या असंख्य बलिदानाची आठवण करून देतो. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देखील तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली.

देशभरातील ऐतिहासिक इमारतीवर तिरंग्याच्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तिरंगी फुलांची सजावट करून आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले. मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली. देवाचे प्रवेश द्वार, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात.

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष

दरवर्षी भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाची प्रगती, कर्तृत्व आणि भविष्यातील उद्दिष्टे प्रतिबिंबित होतात. यंदाचे भाषण हे पंतप्रधान मोदी यांचे सलग ११ वे स्वातंत्र्य दिनाचे भाषण असेल आणि त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले भाषण असेल. ध्वजारोहण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिक देशभक्तीपर गीते गाऊन दरवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात जेथे मुलांना स्वातंत्र्यावर भाषणे आणि कवितांचे वाचन करण्यासाठी, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी, देशाच्या कानाकोपऱ्यातून सांस्कृतिक नृत्य सादर करण्यासाठी आणि गाणी गाण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

इतिहास आणि महत्त्व

स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट १९४७ रोजी २०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. १८५७ च्या रोव्होल्टपासून देशाने स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात केली. पुढे १९२० च्या सुमारास महात्मा गांधीयांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्याला वेग आला. अखेर ४ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सने भारतीय स्वातंत्र्य विधेयक मांडले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र देश झाला. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर प्रत्येक पंतप्रधानाने देशाला उद्देशून भाषण करण्याची परंपरा सुरू झाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर