मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sukhoi plane crashed in Nifhad : मोठी बातमी! नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी

sukhoi plane crashed in Nifhad : मोठी बातमी! नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी

Jun 04, 2024 02:54 PM IST

sukhoi plane crashed in Nifhad in Nashik : नाशिक येथे आज सकाळी हवाई दलाचे एक विमान कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत वैमानिक सुदैवाने वाचला आहे. नेमका हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.

नाशिक येथे आज सकाळी हवाई दलाचे सुखोई लढाऊ  विमान कोसळल्याची माहिती पुढे आली आहे
नाशिक येथे आज सकाळी हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान कोसळल्याची माहिती पुढे आली आहे

sukhoi plane crashed in Nifhad in Nashik : नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे आज भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई ३० कोसळले आहे. निफाड येथील एका टोमॅटोच्या शेतात हे विमान कोसळले आहे. सुदैवाने वैमानिकाने विमानातून एजेक्ट केल्याने वैमानिक बचावला आहे. तर विमानातील पायलट जखमी झाले असल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला, असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेस-शरद पवार नव्या खेळीच्या तयारीत

देशात आज लोकसभा निवडणूक मतमोजणीची धामधूम सुरू आहे. मात्र, ही मतमोजणी सुरू असतांना नाशिकच्या निफाड येथे मोठा अपघात झाला आहे. आज १० ते ११ च्या सुमारास हवाई दलाचे सुखोई ३० हे लढाऊ  विमान कोसळून  अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला, या बाबत अद्याप माहीती मिळू शकली नाही. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच वैमानिकाने विमानातून इजेक्ट होत पॅराशुटचा वापर करुन उडी घेतल्याने तो बाचावला आहे. या अपघातानंतर एचएएल आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. विंग कमांडर बोकील आणि बिस्वास असे या विमान अपघातातून वाचलेल्या वैमानिकांची नावे आहेत. त्यांना एचएएल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातग्रस्त विमानाचे भाग ५०० मीटर परिसरात पसरलेले आहेत.

हवाई दलाने या अपघाताची अधिकृत माहीती अध्याप दिली असून या प्रकरणी चौकशी समिति स्थापन करण्यात येईल अशी माहिती आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग