Edible Oil price hike: फोडणी महागली! खाद्य तेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर २५ रुपयांची दरवाढ-india hikes edible palm soyabean sunflower oil import tax to support farmers ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Edible Oil price hike: फोडणी महागली! खाद्य तेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर २५ रुपयांची दरवाढ

Edible Oil price hike: फोडणी महागली! खाद्य तेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर २५ रुपयांची दरवाढ

Sep 15, 2024 07:28 AM IST

Edible Oil price hike: केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला असून तब्बल २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे.

 फोडणी महागली! खाद्य तेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर २५ रुपयांची दरवाढ
फोडणी महागली! खाद्य तेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर २५ रुपयांची दरवाढ

Edible Oil price hike: जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश अशी ओळख असणाऱ्या भारतात तेलबियांच्या घसरत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिमाण खाद्य तेलाच्या किमतीवर झाला आहे. सरकारने ही घोषणा करतात खाद्य तेलाच्या किमती किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढले आहेत. त्यामुळे आता स्वयंपाक घरातील फोडणी महाग झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

सरकारने शनिवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली. त्यात आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावरील आयात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, या करवाढीमुळे त्यामुळे आता ११० रुपये किलोला मिळणारे सोयाबीन तेल आता १३० रुपयांना झाले आहे. तर शेंगदाना तेल १७५ वरुण १८५ झाले आहे. तर सूर्यफुल तेल हे ११५ वरून १३० झाले आहे. साधारण २० ते २५ रुपयांची वाढ किलोमागे झाली आहे.

सोयाबिन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क वाढल्यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड सोयाऑइलने तब्बल २ टक्के तोटा दाखवला. रॉयटर्सने ऑगस्टच्या अखेरीस दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात होणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांपूर्वी सोयाबीन उत्पादकांना मदत करण्यासाठी भारत वनस्पती तेलांवरील आयात कर वाढविण्याचा विचार करीत आहे. वनस्पति तेल ब्रोकरेज कंपनी सुनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले, 'बऱ्याच काळानंतर सरकार ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्याही हिताचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पिकासाठी शासनाने ठरवून दिलेली किमान आधारभूत किंमत मिळण्याची शक्यता वाढली आहे. देशांतर्गत सोयाबीनचे दर प्रति १०० किलो ४,६०० रुपये (५४.८४ डॉलर) आहेत, जे राज्य सरकारने निश्चित केलेल्या ४,८९२ रुपयांच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत.

भारत खाद्य तेलाचा मोठा आयातदार देश

भारत आपल्या वनस्पती तेलाची ७० टक्क्यांहून अधिक मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो. प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल खरेदी केले जाते, तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबिन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.

भारतातील खाद्यतेलाच्या आयातीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाम तेल ाचा समावेश आहे, त्यामुळे भारतीय शुल्कवाढीचा पुढील आठवड्यात पाम तेलाच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होणार हे उघड आहे. आज अचानक खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना याची झळ बसणार आहे.

Whats_app_banner