मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीची सभा म्हणजे शिवसेनेसाठी काळा दिवस- एकनाथ शिंदे

Eknath Shinde: शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीची सभा म्हणजे शिवसेनेसाठी काळा दिवस- एकनाथ शिंदे

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 17, 2024 09:30 PM IST

Eknath Shinde On India alliance Sabha: एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडी यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या सभेवरून टीकास्त्र सोडले आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde News: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या ठिकाणाहून नेहमी देशाला संबोधित केले, त्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची आज महासभा होत आहे. यामुळे आजचा दिवस शिवसेनेसाठी काळा दिवस आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

शिवाजी पार्क हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सभांचे ठिकाण राहिले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा समारोप शिवाजी पार्कवरील सभेने केला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्यासाठी ‘इंडिया आघाडी' शक्तीप्रदर्शन करत आहे. या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर राज्यातील नेत्यांनी हजेरी लावली आहे.

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या ठिकाणी काँग्रेसची शेवटची सभा २००३ मध्ये झाली होती, ज्याला सोनिया गांधी यांनी संबोधित केले होते.

एकथा शिंदे म्हणाले की, “शिवसेनेसाठी हा काळा दिवस आहे, कारण शिवाजी पार्क हे असे ठिकाण आहे, जिथून बाळासाहेबांनी देशाला संबोधित केले आणि आज तुम्ही सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत एकाच व्यासपीठावर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात”, असे शिंदे म्हणाले.

"बाळासाहेबांना पक्ष 'काँग्रेस' व्हावा असे वाटत नव्हते, अशी टीका शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली होती. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, 'बाळासाहेबांना शिवसेना भाजप व्हावी, अशीही इच्छा नव्हती.

IPL_Entry_Point