इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. १३ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ठराव महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर चार समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे.
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. या मुद्द्यांबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यानंतर कॅम्पेन कमिटी, वर्किंग ग्रुप ऑफ सोशल मीडिया, वर्किंग ग्रुप ऑफ मीडिया आणि वर्किंग ग्रुप ऑफ रिसर्च या चार समितींची देखील स्थापना करण्यात आली आहे. सर्व पक्षांचे नेत्यांचा या कमिटींमध्ये समावेश करण्यात आला आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीचा लोगो अद्याप ठरलेला नाही. त्यासाठी काही सूचना आणि प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ते आल्यानंतर त्यातून लोगो ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत घाई करू नये असं काँग्रेसला वाटतं. पुढच्या काही महिन्यांत देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यांचे निकाल आल्यानंतर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं काँग्रेसला वाटतं. तसं झाल्यास काँग्रेसला आपली बाजू मजबूत करता येईल असा पक्षातील सूत्रांचा होरा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत इंडिया आघाडीकडून देशभरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त एकीने राहून एनडीला झटका द्यायचा, अशी इंडिया आघाडीची रणनीती आहे.
संबंधित बातम्या