मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  India Alliance Meet : 'इंडिया' च्या संयोजकपदी कुणाची वर्णी? महाराष्ट्रातील ‘या’ दोन नेत्यांची नावे आघाडीवर

India Alliance Meet : 'इंडिया' च्या संयोजकपदी कुणाची वर्णी? महाराष्ट्रातील ‘या’ दोन नेत्यांची नावे आघाडीवर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 31, 2023 11:08 PM IST

Indiaalliancemeeting in mumbai : इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव संयोजक पदासाठी आघाडीवर होते. मात्र त्यांनी नकार दिल्याने पाच नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

India alliance meeting in mumbai
India alliance meeting in mumbai

मुंबई : भाजपविरोधी पक्षाच्या आघाडीची इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. यापूर्वी पाटणा व बंगळुरूनंतर  सर्व विरोधक मुंबईत जमले आहेत. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडं सर्व भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडं इंडिया आघाडीच्या संयोजकपदी कुणाचा वर्णी लागणार? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

त्यातच केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावले आहे. कदाचित लोकसभेचं हे शेवटचं अधिवेशन  असू शकतं. या अधिवेशनानंतर विद्यमान लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती राजकीय सुत्रांकडून मिळत आहे. याबरोबरच या अधिवेशनात 'एक देश एक निवडणूक' विधेयक (One Nation One Election Bill) आणले जाण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्यास विरोधकांची तारांबळ उडणार आहे. त्यांच्या अदयाप प्राथमिक बोलणीच्या बैठकाच सुरु आहेत. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, यावर एकमत झालं नाही. तसेच अध्यक्ष आणि संयोजकही ठरलेले नाहीत. इंडिया आघाडीत २८ पक्षांचा समावेश असल्याने त्यांच्या जागा वाटपाचा तिढा सोडवणेही गुंतागुंतीचे आहे. विशेष अधिवेशन व मुदतपूर्व निवडणुकीच्या शक्यतेमुळे मुंबईतील बैठकीत इंडियाच्या संयोजकपदाचा निर्णय अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे संयोजकपदासाठी आघाडीवर - 
इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव संयोजक पदासाठी आघाडीवर होते. काँग्रेससह लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरेंनीही संयोजकपदासाठी नितीशकुमारांचे नाव पुढे केले होते. मात्र नितीशकुमार यांनी संयोजक बनण्यास नकार दिल्याने संयोजकपदासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या नावाची चर्चा आहे. यात पवार आणि ठाकरेंचं नाव आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 

WhatsApp channel