मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satyajit Tambe : बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजीत तांबेंकडे किती संपत्ती?, शपथपत्रातून मोठा खुलासा

Satyajit Tambe : बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजीत तांबेंकडे किती संपत्ती?, शपथपत्रातून मोठा खुलासा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 10:17 AM IST

Satyajit Tambe Property : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष फॉर्म भरणाऱ्या सत्यजीत तांबेंनी शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल खुलासा केला आहे.

Satyajit Sudhir Tambe Property
Satyajit Sudhir Tambe Property (HT)

Satyajit Sudhir Tambe Property : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर सुधीर तांबे यांचे चिंरजीव आणि काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत काँग्रेससह महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळं आता काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच बाळासाहेब थोरातांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. त्यामुळं आता अपक्ष उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या सत्यजीत तांबे गर्भश्रीमंत असल्याचं समोर आलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्र सादर केलं आहे. त्यात सत्यजीत तांबे यांनी स्वत:चं वार्षिक उत्पन्न ४९ लाख रुपये असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय सत्यजीत यांच्याकडे ३० लाखांचे ६० तोळे सोनं असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. सत्यजीत यांची पत्नी मैथिली तांबे यांच्याकडे १५.८५ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असून त्यांच्याकडे ५२ लाखांची रोकड आहे. याशिवाय पत्नीकडे दीड कोटींचं ३०० तोळे सोनं असल्याची माहिती सत्यजीत तांबेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात सांगितलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात गेल्या १८ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे मेहूणे असलेले सुधीर तांबे हे या मतदारसंघातून गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. परंतु यावेळी सत्यजीत तांबे यांनी पदवीधरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु काँग्रेसनं ऐनवेळी त्यांच्या वडिलांना तिकीट दिल्यामुळं सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मुलानंच निवडणुकीचा अर्ज भरल्यानं सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर सत्यजीत यांनी महाविकास आघाडीसह भाजप आणि शिंदे गटासोबत निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

WhatsApp channel