मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री केलं ध्वजारोहण, परंपरा राखली कायम

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री केलं ध्वजारोहण, परंपरा राखली कायम

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 15, 2022 09:02 AM IST

Independence Day: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ध्वजारोहण करत असताना त्यावेळी ठाकरे गटातील राजन विचारे हेसुद्धा उपस्थित राहिले होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मध्यरात्री केलं ध्वजारोहण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मध्यरात्री केलं ध्वजारोहण

Independence Day: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात असून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ वाजता ठाण्यातील शिवसेनेच्या शाखेत ध्वजारोहण केलं. ठाण्यात आनंद दिघे जिल्हाध्यक्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण कऱण्याची परंपरा होती. चाळीस वर्षांपूर्वीची ही परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली आहे. ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे ध्वजारोहणासाठी आले असताना ठाकरे गटाचे राजन विचारे हेसुद्धा उपस्तित होते. पोलिसांनी त्यांना नोटीस दिल्यानंतरही राजन विचारे तिथे आल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ वाजता ठाण्यातील शिवसेनेच्या शाखेत ध्वजारोहण केलं. आनंद दिघे यांनी ठाण्याचे जिल्हाध्य़क्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा चाळीस वर्षांपूर्वी सुरू केली होती. मुख्यमंत्री ठाण्यात ध्वजारोहण करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटात असणाऱ्या राजन विचारे यांना पोलिसांनी नोटीस दिली होती. तरीही ते या कार्यक्रमासाठी आल्यानंतर काही काळ दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.

ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, देशभरात अमृत महोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांना अभिवादन करतो. आनंद दिघे यांनी ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहणाची परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला."

ध्वजारोहणासाठी उद्धव गटात असलेले राजन विचारेसुद्धा उपस्थित होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या." मंत्रिमंडळातील खातेवाटपावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मंत्र्यांवर ज्या विभागाची जबाबदारी दिलेली आहे, ती यशस्वीपण पार पाडतील, आता ते राज्याचे मंत्री आहेत."

WhatsApp channel