मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  iNCOVACC Vaccine: मुंबईतील जेष्ठांना आजपासून इन्कोव्हॅक लस मिळणार; कुठे, कधी आणि कोणाला घेणार येणार?

iNCOVACC Vaccine: मुंबईतील जेष्ठांना आजपासून इन्कोव्हॅक लस मिळणार; कुठे, कधी आणि कोणाला घेणार येणार?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 28, 2023 12:43 PM IST

iNCOVACC Vaccine: मुंबईतील जेष्ठांना आजपासून इन्कोव्हॅक लस मिळणार; कुठे, कधी आणि कोणाला घेणार येणार?

COVID19
COVID19 (HT_PRINT)

BMC: देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना वाढता धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वृद्ध नागरिकांना नाकावाटे इन्कोव्हॅक लस देण्याची मोहिम हाती घेतली. या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेच्या २४ वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक लस दिली जाणार आहे. लसीचे मोफत डोस केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच उपलब्ध असतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

कोणाला घेता येणार?

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आजपासून इन्कोव्हॅक ही लस ६० वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे.कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची मात्रा घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही लसीची मात्र घेतलेल्या नागरिकांना ही लस घेता येणार नाही, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

कुठे आणि कधी मिळणार?

मुंबई महानगरपालिकेच्या २४ वार्डमधील निवडक ठिकाणी ही लस दिली जात आहे. प्रत्येकी वॉर्डमध्ये एक लसीकरण केंद्र असेल. लसीकरण केंद्रावरच या लसीची नोंदणी केली जाईल. लसीकरण केंद्रे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत सुरू राहतील. इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे.

महाराष्ट्रात गुरुवार ७५४ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर, तीन मृत्युंची नोंद करण्यात आली. मृतांमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर येथील रुग्णाचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत गुरुवारी घट पाहायला मिळाली. मुंबईत बुधवारी १८५ रुग्ण सापडले होते. तर, गुरुवारी १३५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १२४ जणांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षण आढळून आले. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ११४ वर पोहचली आहे.

WhatsApp channel