Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं मंगळवारी छापा टाकला होता. त्यांच्या सातारा, पुणे आदि मालमत्तेवर हा छापा टाकण्यात आला होता. १७ तास उलटले तरी ही कारवाई सुरूच आहे. अधिकाऱ्यांना मोठं घाबड हाती लागलं असून याची चौकशी ते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे करत आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार होते. मात्र, त्यापूर्वी ही कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार होते. मात्र, बुधवारी सकाळी ६ वाजता पासून त्यांच्या पुण्यातील व सातारा येथील घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. निंबाळकर यांची चौकशी आज देखील सुरू आहे. संजीवराजे निंबाळकर यांची पुण्यातील त्यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून गेल्या १७ तासांपासून चौकशी सुरू आहे. तसेच गोविंद दूध डेअरी बाबत देखील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. त्यांच्या पुणे, फलटण येथील निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले.
फलटण येथे बुधवारपासून आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत आयकर विभागाचे कर्मचारी संजीवराजे यांच्या बंगल्यातून बाहेर पडले. यानंतर संजीवराजे यांनी घराबाहेर येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली व त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशिवाय रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरही आयकर विभागाने कारवाई केली आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून त्यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी व पुण्यातील बंगल्यावर कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. निवासस्थानामधील सर्वांचे मोबाईल देखील काढून टाकण्यात आले होते. तर घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या