Nashik IT raid : नाशिकमध्ये आयकर विभागाने तब्बल ८ सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकले असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही छापेमारी सुरू आहे. तब्बल २०० अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून ८५० कोटीहून अधिक संपत्ती आणि बेहिशेबी व्ययव्हरांचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, आपली संपत्ती अधिकाऱ्यांच्या हाती लागू नये या साठी काहींनी आपली कारमध्ये रोकड लपवून झाडाझुडपात लपवून ठेवली तर काहींनी व्यवहाराचे कागदपत्रे आणि पेनड्राईव छतावर आणि पंख्यावर लपवले होते.
नाशिक येथे सरकारी कंत्राटदारांवर आयकर विभागाने फास आवळला आहे. गेल्या चार ते पाच दिवापासून महापालिकेच्या ८ कंत्राटदारांवर ही कारवाई सुरू आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोकड आणि काही कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने व बिस्किट जप्त केले आहेत.
काही कंत्राटदारांनी त्यांच्या संपत्ती संबंधी माहिती असलेले पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क हे घराच्या छतात लपून ठेवले होते. तर एकाने तर घरातील पांख्यात तब्बल २ जीबी माहिती असलेला पेन ड्राईव्ह लपून ठेवला होता. एकाने गाडीत रोकड ठेवून ती गाडी झाडा झुडपात लपवल्याची माहिती आहे.
ही कारवाई अजून सुरूच असून आणखी मोठे घबाड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. अधिकारी कंत्राटदारांच्या नातेवाईक तसेच आप्तस्वकीयांची देखील तपासणी करत आहेत.