IT Raid: पुण्यात इन्कम टॅक्सची मोठी कारवाई; सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयांवर छापे
IT Raid on City Group Pune : इन्कम टॅक्स विभागानं पुण्यात आज मोठी कारवाई केली आहे. सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत.
IT Raid on City Group Pune : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात, बीबीसी या वृत्तसंस्थेवर पडलेल्या छाप्यांमुळं देशभरात चर्चा सुरू असतानाच आज इन्कम टॅक्स विभागानं पुण्यात मोठी कारवाई केली. सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांमुळं पुण्यातील उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अमानोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारी इथं झाडाझडती घेत आहेत.
सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एका आघाडीचा समूह आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी सिटी ग्रुपची स्थापना केली असून ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुण्यात सिटी ग्रुपचे अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प साकारले आहेत. सिटी ग्रुपमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय इन्कम टॅक्स विभागाला आहे. त्याच आधारे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी अनिरुद्ध देशपांडे यांची ओळख आहे.