IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ! आयकर विभाग करणार चौकशी; अपंग प्रमाणपत्राबाबत महत्वाची माहिती समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ! आयकर विभाग करणार चौकशी; अपंग प्रमाणपत्राबाबत महत्वाची माहिती समोर

IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ! आयकर विभाग करणार चौकशी; अपंग प्रमाणपत्राबाबत महत्वाची माहिती समोर

Jul 16, 2024 12:35 PM IST

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आयकर विभाग या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करणार आहे. तर पूजा खेडकर यांच्या अपंग प्रमाण पत्राविषयी देखील गंभीर माहिती पुढे आली आहे.

खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ! आयकर विभाग करणार चौकशी; अपंग प्रमाणपत्राबाबत महत्वाची माहिती समोर
खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ! आयकर विभाग करणार चौकशी; अपंग प्रमाणपत्राबाबत महत्वाची माहिती समोर

milvle IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हे नाव सध्या देशभर चर्चेत आहे. राजेशाही थाटात राहणाऱ्या पूजा खेडकर यांच्या बद्दल महत्वाची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या प्रमाणपत्राबद्दल ही माहिती आहे. या सोबतच आता आयकर विभाग देखील खेडकर कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करणार आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांनी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच हा चौकशी अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर आता आयकर विभागा खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आहे. खेडकर यांच्या आयटीआर वरून ही पडताळणी केली जाणार आहे.

पूजाचे आई वडील गायब, बंगल्याला लावले कुलूप, गुन्हा दाखल

या प्रकरणात आता आणखी एक नवीन बाब समोर आली आहे. पूजानंतर तिचे आई-वडील अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर स्थानिक शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहेत. दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी आज दिवसभर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही मिळून आले नाहीत. त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, " दोघही आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांचे फोन बंद आहेत. पोलीस त्यांच्या घरीही गेले होते, पण ते तिथे हजर नव्हते. स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पथके पुणे आणि परिसरात त्यांचा शोध घेत आहेत.

पुणे पोलीस देणार शासनाला अहवाल

पुणे पोलीस आयुक्तालय पूजा खेडकर यांच्यासंदर्भात एक सविस्तर अहवाल शासनाला देणार आहे. त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे, गाडीवर लावलेला अंबर दिवा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना त्यांच्या पालकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलेली दमदाटी याचा समावेश अहवालात असणार आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाला काही संघटनांनी पुजा यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल चौकशी करावी असे निवेदन दिले होते. यावरुन अपंग कल्याण आयुक्तालयाने पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले आहे. त्यांना पूजा यांनी वैद्यकीय प्रमाणपत्रे कोठून मिळवली याची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान नैसर्गिक न्याय तत्वाने पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना शस्त्र परवाना रद्द का करु नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

वेगवेगळे पत्ते दाखवून प्रमाणपत्र मिळवले

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी एका प्रा. लि. कंपनीचा पत्ता, रेशनकार्ड हा वास्तव्याचा पुरावा दाखवला आहे. त्यांनी दोन वेगवेगळे पत्ते वापरून वायसीएम हॉस्पिटल आणि जिल्हा हॉस्पिटल, औंध येथे अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं पुढे आले आहे. आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी वापरलेली ऑडी कार ही थर्मोवेरिटा कंपनीच्या नावावर आहे. पूजा यांनी २८/८/२२ रोजी औंध रुग्णालयात अर्ज केला आणि दुसऱ्या दिवशी वायसीएमने त्यांना एकाच दिवसांत अपंग प्रमाणपत्र दिलं. तर यापूर्वीचे दाखले अहमदनगर जिल्ह्यातून देण्यात आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर