मोठी बातमी.. आता पहिलीपासूनच कृषी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी.. आता पहिलीपासूनच कृषी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मोठी बातमी.. आता पहिलीपासूनच कृषी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Dec 24, 2023 03:11 PM IST

Agriculture subject in school syllabus : आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे. अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.

दीपक केसरकर
दीपक केसरकर

पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना आता शेतीचे धडे मिळणार आहेत. पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर आलेल्या केसरकर यांनी ही घोषणा केली केली. कृषी शिक्षण काळाजी गरज झाली आहे. त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषीचे धडे दिले जाणार आहेत, असं मंत्री केसरकर म्हणाले. 

केसरकर म्हणाले की, निसर्गाची सध्या हानी होत असल्याचं आपण एकत आहोत. त्यामुळे भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार आहेत. मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषीला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय अनिवार्य केला जाणार आहे. 

केसरकर म्हणाले की, आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा  सरकारचा विचार आहे. कृषी शिक्षणासाठी शिक्षण विभागाने नवा मसुदा तयार केला आहे. या नव्या विषयाचा अभ्याक्रमात समावेश करण्यापूर्वी शिक्षकांना देखील याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. अनेक शिक्षकांनी कृषी विषयाचं शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे,  कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषीचं प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर