पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच! कोल्हेवाडीत भरदिवसा तरुणाची सपासप वार करुन निर्घृण हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच! कोल्हेवाडीत भरदिवसा तरुणाची सपासप वार करुन निर्घृण हत्या

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच! कोल्हेवाडीत भरदिवसा तरुणाची सपासप वार करुन निर्घृण हत्या

Nov 28, 2024 02:17 PM IST

Pune kolhewadi murder news : कोल्हेवाडी, खडकवासलाजवळ भरदिवसा कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच! कोल्हेवाडीत भरदिवसा एकाची सपासप वार करुन निर्घृण हत्या संपवलं
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच! कोल्हेवाडीत भरदिवसा एकाची सपासप वार करुन निर्घृण हत्या संपवलं

Pune Crime news : पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्या जवळील डोणजे येथे एका माजी उपसरपंच असलेले विठ्ठल पोळेकर याचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना आता कोल्हेवाडी, खडकवासला जवळ भरदिवसा कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

सतीश थोपटे (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी (दि २७) सायंकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे घडली. सतीश सुदाम थोपटे हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करत होता. त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा गुन्हा देखील दाखल होता. सतीश थोपटे हा बुधवारी दुपारी कोल्हेवाडी भागात आला होता. यावेळी काही जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. सतीश थोपटेवर अनेक वार करण्यात आले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने स्थानिकांनी दवाखान्यात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

ही घटना येथील एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस त्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार थोपटे याच्या नावावर सदनिका खरेदीसाठी एकाने २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्यात मोठा वाद झाला होता. याच आर्थिक वादातून थोपटे याचा खून करण्यात आल्याची माहिती आहे. सतीश थोपटे याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर