मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune girl rape : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

Pune girl rape : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 16, 2024 01:06 PM IST

Pune girl rape : पुण्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर एका पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

Pune girl rape : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने तरुणीचा जामखेड येथील एका रुग्णालयात गर्भपात देखील केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai heat wave: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा

किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीही पोलीस भरतीची तयारी करत आहे, मात्र, तिचे भरतीचे स्वप्न भंगले आहे.

Ram Navami bank Holiday : राम नवमीनिमित्त उद्या 'या' शहरात बँकांना सुट्टी; ऑनलाइन व्यवहारांना द्या प्राधान्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी ही पोलिस भरतीची तयारी करते. यातूनच तिची आणि आरोपी महामुनीशी ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तसेच तिला लग्न करण्याचे आमिष देखील दाखवले. यावेळी त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तिला महामुनीने त्याच्या शिवाजीनगर येथील घरी नेत तिच्याशी वारंवार शरीर संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी ही गर्भवती झाली.

Bombay high court : झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार; रात्रभर चौकशी करता येणार नाही! हायकोर्टाने ईडीला फटकारले

त्यानंतर त्याने तिला नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेट या ठिकाणी तिचा गर्भपात केला. तसेच तरुणीला धमकावत या प्रकरणी कुणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, धमकावून तिचा गर्भपात केला. यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ 

पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोयता गँग, मारामारी, खून आणि बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहे. यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालावा अशी मगणी नागरिक करू लागले आहेत. 

IPL_Entry_Point

विभाग