मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune traffic update : श्री गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या मध्य भागातील वाहतुकीत बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद

Pune traffic update : श्री गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या मध्य भागातील वाहतुकीत बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद

Feb 13, 2024 12:20 PM IST

Pune traffic update : पुण्यात आज श्री गणेश जयंती निमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Pune Traffic
Pune Traffic

Pune traffic update : आज श्री गणेश जयंती आहे. यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहे. यामुळे या मार्गावर होणारी गर्दी पाहता तसेच भाविकांच्या सोईसाठी मध्य पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे वाहतूक विभागाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने व्यवळण्यात आली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे मात्र, शिवाजीनगर ते स्वारगेटला जाणाऱ्या प्रवाशांची मात्र, मोठी गैरसोय होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sanjay Raut : मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल; संजय राऊत यांची जळजळीत टीका

गणेश जयंतीच्या निमित्ताने आज, मंगळवारी (दि १३) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या मुळे या मार्गावर मोठी गर्दी होत असते. ही वाढणारी गर्दी पाहता पुणे वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पुणे वाहतूक पोलिसांच्या या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या हजारो सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसला आहे. पोलिसांनी संकष्टी चतुर्थीप्रमाणे दर्शनाची रांग आणि वाहतूक दोन्ही सुरू ठेवली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग! निर्माता, दिग्दर्शकावर गुन्हा

अशी असेल वाहतूक

शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, अलका चित्रपटगृह मार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.

रस्ते बंद करण्याचा प्रयोग कधी बंद होणार ?

पुण्यातील वाहतूक कोंडी पार करणे मोठे दिव्य झाले आहे. त्यात पोलिस बिनधास्तपणे कोणतेही रस्ते कधीही बंद करत असल्याने पुणेकरांची कोंडी होत आहे. शिवाजीनगर स्वारगेट रस्ता हा नवीन वर्ष, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती या दिवशी गर्दी होण्याची कारणे देत कधीही बंद करतात. शिवाजीनगर आणि स्वारगेट हे दोन महत्त्वाचे भाग जोडणारा शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करतात. यामुळे याचा ताण हा पुण्यातील इतर रस्त्यावर होतो. पुण्यात आधीच मेट्रो आणि इतर विकास कामामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी असते. त्यात रस्ते बंद करण्याचा प्रयोग पुणे पोलिस करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र, वेठीस धरले जाते. त्यामुळे पोलिसांनी हा खेळ बंद करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग