मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune L3 pub : पुण्यातील एल ३ लिक्विड लिजर लाउंज पबची पतीत पावन संघटनेकडून तोडफोड

Pune L3 pub : पुण्यातील एल ३ लिक्विड लिजर लाउंज पबची पतीत पावन संघटनेकडून तोडफोड

Jun 24, 2024 04:41 PM IST

Pune Liquid Leisure lounge news : फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाउंज या पबमध्ये शनिवारी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्स सेवन करत असल्याचे आढळले होते. यानंतर या पबवर कारवाई करण्यात आली. आज पतीत पावन संघटनेने या पबची तोडफोड केली.

 पुण्यातील ड्रग्स पार्टी झालेल्या एल ३ लिक्विड लिजर लाऊज पबकही पतीत पावन संघटनेकडून तोडफोड; विडियो व्हायरल
पुण्यातील ड्रग्स पार्टी झालेल्या एल ३ लिक्विड लिजर लाऊज पबकही पतीत पावन संघटनेकडून तोडफोड; विडियो व्हायरल

Pune L3 pub : पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज पबमध्ये शनिवारी मोठी पार्टी झाली. या पार्टीत बाथरूममध्ये काही मुले ड्रग्स घेतानाचे व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने या पबवर कारवाई करत हा पब सील केला तसेच ९ जणांवर गुन्हा दाखल करत ८ जणांना अटक करण्यात आली. आज या पब विरोधात पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भूमिका घेत या पबवर दगडफेक करत तोडफोड केली. या तोडफोडीचा विडियो सध्या व्हायरल होतो आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पबमध्ये शनिवारी मोठी पार्टी रंगली होती. या पार्टीत तरुणांनी तब्बल ८० ते ८५ हजार रुपये दारू आणि खाण्यावर उडवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

दरम्यान, पबमध्ये धांगडधिंगा घालत असतांना बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेमुळे पुण्यात ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी विरोधी पक्षातील नेते मंडळी आक्रमक झाली होती. या प्रकरणी कारवाईकही मागणी देखील करण्यात आली होती.

या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, तर ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी एल ३ लिक्विड लिजर लाऊज पब सील केला आहे. तर रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, मानस मलिक, अक्षय कामठे यांसह अन्य तिघेमिळून आठ जणांना अटक केली आहे. तसेच या पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांची चौकशी करत आहे.

पुण्यातील संस्कृती खराब होत असल्याने पतित पावन संघटनेच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनी दुपारी १ च्या सुमारास एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब समोर येत घोषणाबाजी केली. तसेच येथील कुंड्यांची तोडफोड केली. व पबवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर