Pune Crime : जेवण आवडले नाही म्हणून बांधकाम मजुराचा खून; पुण्यातील उंड्री येथील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : जेवण आवडले नाही म्हणून बांधकाम मजुराचा खून; पुण्यातील उंड्री येथील धक्कादायक घटना

Pune Crime : जेवण आवडले नाही म्हणून बांधकाम मजुराचा खून; पुण्यातील उंड्री येथील धक्कादायक घटना

Published Jul 16, 2024 05:37 AM IST

Pune murder Crime : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांचे खून, मारणाऱ्या या घटना वाढल्या आहेत. उंड्री परिसरात जेवण न दिल्यामुळे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

जेवण आवडले नाही म्हणून बांधकाम मजुराचा खून; पुण्यातील उंड्री येथील धक्कादायक घटना
जेवण आवडले नाही म्हणून बांधकाम मजुराचा खून; पुण्यातील उंड्री येथील धक्कादायक घटना

Pune murder Crime : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांचे खून, मारणाऱ्या या घटना वाढल्या आहेत. उंड्री परिसरात जेवण न दिल्यामुळे एका बांधकाम मजूराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोंढव्यातील उंड्री परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर कमल नारायण मार्डी (वय ४९, रा. जियापूर, पश्चिम बंगाल) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

कोंढवा भागातील उंड्री परिसरात अनेक गृहप्रकल्पाचे काम सध्या सुरू आहेत. या गृहप्रकल्पातील कामगार वसाहतीत काही मजूर राहायला आहेत. सरकार, मार्डी हे दोघे देखील या ठिकाणी राहायला आहेत. शुभम शास्त्री सरकार यांनी रविवारी सहकारी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केले. मात्र या जेवणाची चव न आवडल्याने मार्डीने शुभम शास्त्री सरकारला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून दोघांमध्ये मोठा वाढ झाला. या वादातून मार्डीने रागाच्या भरात सरकारच्या डोक्यात खली पडलेला हातोडा मारला. हा घाव त्याच्या चेहऱ्यावर नाकावर बसला. यामुळे शुभम शास्त्री सरकार हे गंभीर जखमी झाले. आरोपी मार्डीने शेजारी असलेल्या सरकार यांना मारहाण केल्याने ते या घटनेत गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती केले असता उपचार सुरू असतांना शुभम शास्त्री सरकार यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा पूर्ण केला आहे. तर आरोपी कमल नारायण मार्डी याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

येरवड्यातील खुल्या कारागृहातून कैदी पसार

येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पळून गेला. या कैद्याचा पोलिस शोध घेत आहेत. आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवीपाडा गावचा रहिवासी आहे. त्याने २००९ मध्ये गावात एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालायने त्याला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा दिली होती. भवर येरवडा कारागृहात होता. त्याची वर्तणूक चांगली असल्याने त्याला खुल्या करगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, त्याने याकचा फायदा घेत कारागृहातून पळ काढला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर