पुण्यात ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराने स्वत:चा चाकूने गळा चिरून केली आत्महत्या, ठेकेदाराला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराने स्वत:चा चाकूने गळा चिरून केली आत्महत्या, ठेकेदाराला अटक

पुण्यात ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराने स्वत:चा चाकूने गळा चिरून केली आत्महत्या, ठेकेदाराला अटक

Oct 05, 2024 10:43 AM IST

Pune crime news : पुण्यात एका कामगाराने ठेकेदाराच्या त्रासला कंटाळून स्वत:चा गळा चिरून आत्मतहत्या केल्याचे उघड झालं आहे.

पुण्यात ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराने स्वत:चा चाकूने गळा चिरून केली आत्महत्या, ठेकेदाराला अटक
पुण्यात ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराने स्वत:चा चाकूने गळा चिरून केली आत्महत्या, ठेकेदाराला अटक

Pune crime news : पुण्यात एका कामगाराने ठेकेदाराच्या त्रासला कंटाळून स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आत्महत्येस जबादर ठरल्याप्रकरणी ठेकेदारांवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी वारजे येथे घडली. या प्रकरणी ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. रामविकास जयसिंग चौहान (वय २६, मूळ रा. राधिया देवरिया, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्याच कामगाराचे नाव आहे. तर सत्येंद्र राजपती चौहान (वय २६, सध्या रा. देशमुखवाडी, शिवणे, मूळ रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे ठेकेदाराचे नाव आहे.

या घटनेचे वृत्त असे की, सत्येंद्र चौहान हा ठेकेदार आहे. तो मोठ्या इमारतींना रंग देण्याचे काम करतो. या साठी त्याने तीन ते चार कामगार त्याच्याकडे ठेवले आहे. दरम्यान, रामविकास याच्या मित्राने सत्येंद्र याच्याकडून २५ हजार रुपये ऊसने घेतले होते. रामविकासचा मित्र सत्येंद्रकडे कामाला आहे. त्याचे पैसे न परता करता रामाविकासचा मित्र उत्तर प्रदेशला निघून गेला. यामुळे सत्येंद्र हा त्याच्यावर चिडला होता. यामुळे भडकलेल्या सत्येंद्रने ३० ऑक्टोबर रोजी रात्री रामविकास याच्यासह त्याच्या दोन कामगारांना खोलीत कोंडून ठेवले. या बाबत रामविकासने उत्तर प्रदेशात राहणाऱ्या त्याच्या आईला याची माहिती दिली होती. त्याच्या आईने सत्येंद्र याच्याशी या बाबत बोलली असता, रामविकासच्या आईला सत्येंद्रने शिवीगाळ केली. यामुळे दुखावला गेलेल्या रामविकासने गुरुवारी रात्री स्वत:वर स्वयंपाकघरातील चाकूने गळ्यावर व पोटावर चाकूने वार केले.

दरम्यान, यावेळी खोतील असलेल्या इतर कामगारांनी आरडा ओरडा करत जखमी रामविकासला दवाखान्यात भरती केले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी रामविकासच्या मित्रांकडे चौकशी केली. यावेळी त्याच्या सहकाऱ्याने सत्येंद्रने दिलेल्या त्रासामुळे वैतागलेल्या रामविकासने आतम्हत्या केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी ठेकेदार सत्येंद्र याला आत्महत्येस जबाबदार ठरल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर