मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा! घर नावावर करून देत नसल्याने मुलांची आईला गंभीर मारहाण

Pune Crime : पुण्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा! घर नावावर करून देत नसल्याने मुलांची आईला गंभीर मारहाण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 01, 2024 10:53 AM IST

Pune gokhle nagar Crime : पुण्यात आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी एक घटना उघडकीस आली आहे. आई घर नावावर करून देत नसल्याने पोटच्या मुलाने तिला गंभीर मारहाण केली आहे.

पुण्यात घर नावावर करून देत नसल्याने मुलांची आईला गंभीर मारहाण
पुण्यात घर नावावर करून देत नसल्याने मुलांची आईला गंभीर मारहाण

Pune gokhle nagar Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. खून, दरोडे, लुटपाटीबरोबर आता नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना देखील उघडकीस येत आहे. पुण्यात गोखले नगर येथे आई घर नावावर करून देत नसल्याने पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात खुर्ची मारून तिला गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलासह त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध! प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

कपिल दीपक सकट, पायल कपिल सकट (वय २६, दोघे रा. निम्हण मळा, पाषाण) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी यशोदा दीपक सकट (वय ५५, रा. जनवाडी, गोखलेनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL च्या ऑनलाइन तिकीट्स खरेदी करताना सावधान; बोगस वेबसाइट्सचा सुळसुळाट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोदा सकट यांचा मुलगा कपिल, त्याची पत्नी पायल, तिची आई आणि मेहुणा हे राहते घर नावावर करून देण्यासाठी यशोदा सकट यांना त्रास देत होते. दरम्यान, यावरून दोन दिवसांपूर्वी कपिल व त्याची आई यशोदा यांच्यात मोठा वाद झाला. या वादातून मुलगा कपिल याने आई यशोदा यांच्या डोक्यात लकडी खुर्ची मारून त्यांना गंभीर जखमी केले. यात यशोदा या गंभीर जखमी झाल्या आहेत.

आज १ एप्रिलपासून 'या' नियमात बदल! सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम; वाचा सविस्तर

कोथरूडमध्ये पोपट विकणारे तिघे अटकेत, दोन पोपट वन विभागाकडून जप्त

पुण्यात पहाडी पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले आहेत. पियूष दत्तात्रय पासलकर (वय २१, रा. कर्वेनगर),यश रमेश कानगुडे (वय २१), सौरभ कोडिंबा झोरे (वय १९, दोघे रा. वारजे) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात पासलकर, कानगुडे, झोरे हे पहाडी पोपट (ॲलेक्झांड्रियन) विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी भांबुर्डा विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ, वनरक्षक डाके आणि पथकाने सापळा लावला. तसेच तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पहाडी पोपट जप्त करण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग