Pune cyber crime : मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune cyber crime : मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले

Pune cyber crime : मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले

Apr 13, 2024 09:22 AM IST

Pune cyber crime : पुण्यात सायब गुन्हेगारीचे (Pune Crime) प्रमाण वाढले आहे. रोज या प्रकारच्या घटना उघकडीस आली आहे. एका सायबर (Pune cyber crime news) भामट्याने मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणीशी ओळख करून तिला ४० लाख रुपयांनी गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

 मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले
मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले (HT_PRINT)

Pune cyber crime : मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पाडली आहे. एका सायबर चोरट्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला खोटे सांगून तिची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी तरुणीने मुंडवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri chinchwad murder : मद्यधुंद अवस्थेत मैत्रिणीवर मित्राने केला बलात्कार! मानलेल्या भावाने केली आरोपीची हत्या

राजेश शर्मासह असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फस‌वणूकीच्या गुन्ह्यासह माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि सायबर गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तक्रारदार तरुणीही पुण्यातील खराडी भागातील रहिवाशी असून ती एका आयटी कंपनीत इंजिनियर आहे. लग्नासाठी तिने एका मॅट्रीमोनिअल साईटवर विवाहसाठी नोंदणी केली होती. यानंतर तिचा आरोपी राजेश शर्माशी या साईटवरून ओळख झाली होती. आरोपी शर्माने तो परदेशातील एका कंपनीत अधिकारी असल्याचे तरुणीला खोटे सांगितले. तिला त्याच्या जाळ्यात ओढत त्याने तिला भूलवले. यानंतर पीडित तरुणीने आरोपी शर्माशी लग्न करण्यास होकार दिला. यानंतर दोघांचेही बोलणे वाढले. दोघेही फोनवरून आणि ऑनलाइनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

Mercedes Benz : मर्सिडीजने भारतीय बाजारात आणले ईव्हीचे नवे मॉडल! लुक आणि वैशिष्ट्ये पाहून व्हाल दंग

आरोपी राजेशने तरुणीला अनेक थापा मारल्या. तो लवकरच भारतात स्थाईक होणार असल्याचे त्याने तरुणीला सांगितले. येथे येऊन तो व्यवसाय सुरू करणार असल्याचे देखील त्याने तरुणीला सांगितले. त्याने भारतात येणार असल्याचे खोटे आणि बनावट तिकीटही तरुणीला पाठवले. यावर तरुणीच्या विश्वास बसला. आरोपीने तरुणीला विमानाने दिल्लीत येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) त्याला पकडले असून त्याची चौकशी सुरू केल्याचे सांगितले. परदेशी चलनाबाबत त्याची चौकशी सुरू करण्यात देखील सांगितले. त्याला तातडीने काही पैसे जमा करावे लागेल अशी थाप त्याने तरुणीला मारून टीला त्याच्या बँकेत लवकर पैसे जमा करण्यास सांगितले. पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या बँक खात्यात तब्बल ४० लाख ५० हजार रुपये पाठवले. यानंतर शर्माने त्याचा फोन बंद केला. यानंतर तरुणीने त्याला वारंवार फोन केला. मात्र फोन बंद लागत असल्याने तिची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर तिने मुंडवा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर