Pune Crime news : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ९ वर्षाच्या मुलाने एका ३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कोंडवा येथे घडली आहे.
पुण्यातील कोंढव्यात तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नऊ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाला जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केले असता, त्याला जामीन मंजूर करून त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांचे कुटुंबीय शेजारी राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. आरोपी मुलगा हा इयत्ता तिसरीत शिकत असून शेजारी राहणारी मुलगी त्याला दादा म्हणायची. ही घटना मुलीच्या घरी घडली. पीडित मुलगी घरी असतांना आरोपी मुलाने तिच्यावर अत्याचार केले. ही बाब मुलीने तिच्या आईला सांगितली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर आईने कोंढवा पोलिस ठाण्यात जात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात अकरा वर्षीय विद्यार्थ्यावर शाळेतील नृत्यशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार पुण्यातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला. या प्रकरणी नृत्य शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, "आरोपी शिक्षकाने सोमवारी ११ वर्षीय विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर विद्यार्थ्याने शाळेच्या समुपदेशकाशी संपर्क साधून शाळेच्या मुख्याध्यापकांना व पालकांना या बाबत माहिती दिली. यानंतर मुलाचे पालक संतप्त झाले असून त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या