Pune Crime : उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा-in pune attempted murder of woman by putting rat poison in water crime against six persons including husband ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Pune Crime : उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Feb 21, 2024 06:56 AM IST

Pune Crime news : पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला उंदीर मारण्याचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Pune Crime news :
Pune Crime news :

Pune Crime news : पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. खराडी येथे एका महिलेजा जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताजी असतांना एका पतीने आपल्या पत्नीला चारित्र्याचा संशयावरुन उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात प्यायला देऊन तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.

Pune drugs racket busted : पुणे बनले ड्रग्स निर्मितीचे केंद्र! पोलिसांची दिल्लीत कारवाई, ८०० कोटींचे ४०० किलो एमडी जप्त

हनुमंत अंकुश गिरी असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर या प्रकरणी सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) हिने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षीचा पाच वर्षांपूर्वी हनुमंत याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ देखील केला. दरम्यान, साक्षीचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता. दरम्यान हनुमंत हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून त्याचे वाद देखील होती होते. दरम्यान, याच रागातून आरोपी पतीने उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिचा खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हटले आहे.

पत्नीवर ब्लेडने पतीकडून वार

काेंढवा परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय महिलेच्या पतीस दारु पिण्याचे व्यसन आहे. संबंधित पती सतत दारु पिऊन घरी येऊन पत्नी साेबत वाद घालत हाेता. त्यामुळे पत्नी मागील एक वर्षापासून त्याच्यापासून विभक्त राहून धुणे भांडीचे काम करते. ती सदर काम एकाठिकाणावरुन करुन घरी परतत असताना, तिचा पती अनमाेल लक्ष्मीकांत गिरी (वय- ३४,रा.काेंढवा,पुणे) हा तिला भेटल व त्याने तिच्याशी वाद घालून ब्लेडने तिच्या मानेच्या डाव्या बाजुस, मागीस बाजूस व उजव्या बाजूस , डाव्या भुवई जवळ, डाव्य हाताचे मनगटापासून काेपऱ्या पर्यंतचे भागावर ब्लेडने वर करुन तिला जखमी केले अाहे. याप्रकरणी काेंढवा पाेलीस ठाण्यात अाराेपीवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

विभाग