पुण्यात धमकीसत्र सुरूच! भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या मेलने खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात धमकीसत्र सुरूच! भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या मेलने खळबळ

पुण्यात धमकीसत्र सुरूच! भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या मेलने खळबळ

Nov 08, 2024 12:23 PM IST

bomb threat at bharati vidyapeeth medical college : पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या बाबतचा मेल विद्यालयाला बुधवारी देण्यात आला.

पुण्यात धमकीसत्र सुरूच! भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या मेलने खळबळ
पुण्यात धमकीसत्र सुरूच! भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या मेलने खळबळ

bomb threat at bharati vidyapeeth medical college : पुण्यात आधी विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकी मिळाली होती. ही घटना ताजी असतांना आता नामांकित भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेऊन मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी महाविद्यालयाचे डॉ. मंदार दत्तात्रय करमरकर (वय ५५, रा. पर्वती दर्शन) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार एका अज्ञात ई-मेल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ महाविद्यालय व वसतिगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते असे विद्यालयाला पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण महाविद्यालय बॉम्ब शोधक पथकाच्या (बीडीडीएस) मदतीने शोध मोहीम राबवली. मात्र, कोठेही काही आढळले नाही.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ई-मेलवर एका व्यक्तीने दोन वेळा ई-मेल पाठवत विद्यालयात बॉम्बस्फोट होण्याची धमकी दिली. ई मेल पाठवणाऱ्याने तामिळनाडूतील एका घटनेचा संदर्भ देखील दिला. महाविद्यालय व वसतिगृह परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याचं डॉ. मंदार करमरकर यांनी सांगितलं. त्यानुसार त्यांनी या गहटणेची गंभीर दाखल घेत भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठत याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व वसतिगृह परिसराची तपासणी केली. पोलिसांनी बीडीडीएस पथकाला बोलावून संपूर्ण परिसर तपासला. मात्र, कोठेही काही ही आढळले नाही. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, तपासात काही ही आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पोलिसांनी या मेलचीतांत्रीक तपासणी केली. हा मेल परदेशातून पाठवला असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, मेल मध्ये थेट धमकी नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ई मेलमध्ये करणाऱ्याला नेमक काय म्हणायचं होत हे स्पष्टं झालं नाही. मात्र, या मेलमुळे पोलिसांची धावपळ उडाली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर