Pune Crime : समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

Pune Crime : समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

Mar 09, 2024 02:33 PM IST

Pune Crime news : पुण्यात एका व्यक्तीने समलैंगिक असतांना देखील ते न सांगता लग्न न केल्याने तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार चंदननगर पोलिस ठाण्यात सासू, सासरे आणि पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा
समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

Pune chandanngar crime : पुण्यात एका व्यक्तीने तो समलैंगिक असतांना देखील ही बाब लपवून एका तरुणीशी लग्न केले. यानंतर या व्यक्तीने या तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Raj Thackeray in nashik : माझ्या हाती सत्ता द्या, सर्व भोंगे एका रात्रीत बंद करतो- राज ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी ही वडगाव शेरी परिसरात राहते. तिचे लग्न हे जुलै २०२२ रोजी एका तरूणाशी झाला होता. दरम्यान, विवाहानंतर तिला तिचा पती हा समलैंगिक असल्याची बाब लक्षात आली. दरम्यान, या बाबत तिने सासू-सासऱ्यांना विचारणा केली. मात्र, यावर उत्तर देण्याचे टाळत या तरुणीचा छळ तिच्या सासू सासरे आणि पतीने सुरू केला.

RRB Technician Vacancy : नऊ हजार रेल्वे तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज सुरू, पात्रतेसह जाणून घ्या या १० महत्वाच्या गोष्टी

काही दिवस हा त्रास तरुणीने सहन केला मात्र, यानंतर कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी तिच्या घरच्यांनी तिच्याकडे केली. या साठी तरुणीला धमकी देखील देण्यात आली. अखेर हा त्रास असह्य झाल्याने तरुणीने थेट चंदननगर पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी याची दखल घेत कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण

पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ३ वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तक्रारदार तरुण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीतील येथील रहिवासी आहे. तरुण आणि त्याची पत्नी मजुरी करतात. ते फिरस्ते आहेत. तरुण आणि त्याची पत्नी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील आरक्षण केंद्र परिसरात थांबले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा देखील होता. त्याला पत्नीला घेऊन तरुणाला दवाखान्यात जायचे होते. ते आरक्षण केंद्र परिसरात असतांना त्यांच्या तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर