मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune drugs racket : पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक! तब्बल ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त

Pune drugs racket : पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक! तब्बल ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 02, 2024 05:52 PM IST

pimpri-chinchwad drugs racket : पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad drug mafia) येथे सापडलेल्या २ कोटी ड्रग्स तस्करी प्रकरणी सहायक पोलिस निरीकाचा सहभाग असल्याचे आढळले असून त्याच्या कडून ४५ कोटी रुपयाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक
पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक

pimpri-chinchwad drugs racket : पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरातदेखील मेफेड्रोन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका ड्रग्स तस्कराच्या मुसक्या सांगवी (sangvi police) पोलिसांनी शुक्रवारी आवळल्या. त्याच्या कडून दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त केले असून या प्रकारात एका पोलिस निरीक्षकाचा देखील हात असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या कडून ४५ कोटी रुपयांचे तब्बल ४४ कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. पोलीसच ड्रग्स तस्करी करत असल्याने खळबळ उडाली आहे.

पुरुषांसाठी महत्वाची बातमी! आता महिलेला 'डार्लिंग' म्हणणे पडेल महागात; खावी लागेल तुरुंगाची हवा

फौजदार विकास शेळके असे अटक करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शेळके हा निगडी पोलीस ठाण्यात नियुक्ती असून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

आमदारांची दादागिरी सुरूच! भाजपच्या एका मंत्र्यावर मारहाणीचा आरोप; पदाधिकाऱ्याने केली पोलिसांत तक्रार

पिंपरी- चिंचवड शहरातील रक्षक चौकात दोन कोटींचे मेफेड्रोन प्रकरणी नमामी झा याला अटक करण्यात आली होती. त्याच्या कडे दोन किलो ड्रग्ज सापडले होते. त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असतांना या प्रकरणात एका पोलिसाचा सहभाग असल्याचे आढळले होते. पोलिस तपासात या ड्रग्स तस्करीत निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. शेळके याला सांगवी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या कडून तब्बल ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विजय मोरे यांनी फिर्याद दिली होती.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि सांगवी पोलिसांनी सखोल चौकशी आणि तपास करत आणखी ४३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत ४३ असे एकूण ४५ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत तब्बल ४५ कोटी रूपये इतकी आहे.

WhatsApp channel