मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Viral Video : पुण्यात चाललंय काय? रील्स तयार करण्यासाठी हातात कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; दोन अल्पवयीन ताब्यात

Pune Viral Video : पुण्यात चाललंय काय? रील्स तयार करण्यासाठी हातात कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; दोन अल्पवयीन ताब्यात

Jun 25, 2024 08:57 AM IST

Pune Viral video: पुण्यात रिल्सच्या नादात तरुण काहीही करण्यापर्यंत मजल मारत आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी रिल्सच्या नादात हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

पुण्यात चाललयं काय? रिल्स तयार करण्यासाठी हातात कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; दोन अल्पवयीन ताब्यात
पुण्यात चाललयं काय? रिल्स तयार करण्यासाठी हातात कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; दोन अल्पवयीन ताब्यात

Pune Viral video: पुण्यात रिल्सच्या नादात तरुणाई वाट्टेल ते करत असल्याचं पुढे आले आहे. रिल्सच्या नादात एका तरुणीने एका इमारतीवर जीव धोक्यात घालून लटकली होती. तर एका तरुणीने हात सोडून बाइक चालवत असल्याचा व्हिडिओ पुढे आला होता. या घटना ताज्या असतांना पिंपरी- चिंचवडच्या वाकड परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी हातात कोयते घेऊन ५ ते ६ वाहनांची तोडफोड करत रिल्स बनवल्याची घटना समोर आली आहे. या मुलांनी कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून गाड्यांचे नुकसान केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री थेरगाव येथे घडली.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव येथे कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यातील दोन अल्पवयीन मुलांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे.

या तिघांनी कोयत्याच्या साह्याने वाहनांच्या काचा फोडल्या. हे करत असतांना दुसरा मुलगा हातात कोयता घेऊन रिल्स काढत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. वाकड येथील गणेशनगरमध्ये तिघांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली.

पाच कार, दोन रिक्षा, एक टेम्पो, दोन दुचाकी, इत्यादी वाहनांची तोडफोड केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तोडफोडीचे मुलांनी दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवल्याचे त्यांनी पोलिसांचा चौकशीत सांगितले. सोशल मीडियावर असे रिल्स टाकून ते पाहून इतरांनी त्यांना भाई म्हणावे व लोक आपल्याला घाबरावे या साठी त्यांनी हे रिल्स तयार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर म्हणाले, वाकडमध्ये अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वाहांनाची तोडफोड केली आहे. दहशत पसरविणे आणि सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी त्यांनी वाहनांची तोडफोड केली आहे. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर