मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पत्नीच्या अफेअरचा पतीनं केला भंडाफोड; लॉजवर जात रूमचा दरवाजा तोडला, नको त्या अवस्थेत प्रियकराबरोबर दिसली पत्नी

पत्नीच्या अफेअरचा पतीनं केला भंडाफोड; लॉजवर जात रूमचा दरवाजा तोडला, नको त्या अवस्थेत प्रियकराबरोबर दिसली पत्नी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 03, 2024 12:32 PM IST

Pune wakad crime : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील वाकड येथे एका लॉजवर पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Pune wakad crime
Pune wakad crime

Pune wakad crime : लॉजवर आपल्या प्रियकरसोबत रासलीला करत असल्याला पत्नीच्या अफेअरचा भंडाफोड पतीने केला आहे. वाकड येथील लॉजवर जात पतीने रूमचा दरवाजा तोडला, यावेळी पत्नी ही नको त्या अवस्थेत प्रियकराबरोबर दिसली. पत्नीने विश्वासघात केल्या प्रकरणी पतीने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

'ही' आयटी कंपनी बनवणार कर्मचाऱ्यांना मालक; याआधी केलंय १५० कारचे वाटप

पती आणि पत्नीचे नाते हे पवित्र मानले जाते. मात्र, या नात्याला काळिमा फसल्याची एक घटना पुण्यातील वाकड येथे उघकडीस आली आहे. पत्नीचे बाहेर दुसऱ्या कुणाशी संबंध असल्याचा पतीला संशय होता. यामुळे पती हा पत्नीवर लक्ष ठेऊन होता. पत्नीला रंगेहात त्याला पकडायचे होते. यामुळे तो तिच्यावर पाळत ठेऊन होता. दरम्यान, गेल्या महिन्यात २८ डिसेंबर रोजी पत्नी ही घरा बाहेर पडली. यावेळी पतीने तिचा पाठलाग केला.

मैत्रीच्या नात्याला काळिमा! एक कोटी रुपयांच्या विम्याच्या रक्कमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून मित्राची हत्या

पत्नी ही वाकड परिसरातील एका लॉजमध्ये गेली. दरम्यान, काही वेळाने तिचा प्रियकर लॉजमध्ये आला. यावेळी पती आणि त्याच्या काही सहकाऱ्याने थेट लॉजमध्ये जात पत्नी असलेल्या रूमचा दरवाजा तोडला. यावेळी पत्नी ही निर्वस्त्र, प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाच पतीला दिसली. दरम्यान पत्नीला पतीने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली. यावेळी पतीने पत्नीच्या प्रियकराला चोप दिला. तसेच या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दखल पात्र तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात पती आणि पत्नीच्या नाते संबंधाला काळिमा फसणाऱ्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला त्याच्या मित्रांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले होते. त्यानंतर आज ही घटना उघडकीस आल्याने पुण्यात नेमके चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

WhatsApp channel