मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri Chinchwad Crime:शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन केलं अपहरण, पिंपरीतील घटना

Pimpri Chinchwad Crime:शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन केलं अपहरण, पिंपरीतील घटना

Jun 24, 2024 05:42 AM IST

Pune Pimpri chinchwad Crime : पुण्यात शरीर संबंध ठेवण्यावरून पती पत्नीत वाद झाल्याने वैतागलेल्या पत्नीने पतीला सोडून दिले. याच रागातून पतीने भर रस्त्यात पत्नीचे अपहरण केले. पतीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पत्नीने थेट पोलिसांत तक्रार दिल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.

शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन केलं अपहरण, पिंपरीतील घटना
शारीरिक संबंधावरून वाद, पतीनं पत्नीला भर रस्त्यात भुलीचं इंजेक्शन देऊन केलं अपहरण, पिंपरीतील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड येथे शरीर संबंध ठेवण्यावरून पती पत्नीत वाद झाला. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीला सोडले. मात्र, संतापलेल्या पतीने पत्नीचे भर रस्त्यात अपहरण करून गाडीत बसून तिला भुलीचे इंजेक्शन देऊन तिचे अपहरण  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने पतीच्या तावडीतून स्वत:ची सोडवणून करून घेत पोलिसांत तक्रार दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

ट्रेंडिंग न्यूज

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रकरण कौटुंबिक आहे. पती व पत्नीमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरून वाद झाला होता. यातून सोडून गेलेल्या पत्नीचे अपहरण पतीने केल्याचे पोलिसांनी सांगितलं. अपहरण केल्यानंतर गाडीतच पीडितेला डांबून ठेवले. तसेच तिला दोन ते तीन वेळा भुलीचे इंजेक्शन देखील देण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पती व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

अपहरण केलेल्या महिलेचे व आरोपी पतीचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच ते दहा दिवसांच्या आतच दोघांचे शारीरिक संबंध ठेवण्यावरून जोरदार वाद झाले. पती हा पत्नीला वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. त्याच्या याच मागणीला पत्नी वैतागली होती. यावरुण दोघांची भांडणे झाली होती. मात्र, अखेर कंटाळलेल्या पत्नीने पतीचे घर सोडून थेट मामाच्या मुलाकडे राहायला गेली. काही दिवसानंतर पतीची घरच्यांनी समजूत काढल्यावर पीडित महिला ही पुन्हा पतीसोबत राहण्यास तयार झाली. मात्र, काही दिवसांनी पुन्हा विविध पद्धतीने शरीर संबंध ठेवण्याची मागणी पती पत्नीकडे करू लागला. अखेर वैतागलेल्या पत्नीने पुन्हा घर सोडून जात मुंबईत तिच्या मैत्रिणिकडे गेली.

दरम्यान, काही दिवसांनंतर कामासाठी पीडित महिला ही पुन्हा पुण्यात आली. तिने पिंपरीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम सुरू केले. याची माहीती ही पतीला समजली. दरम्यान, सासरची मंडळी ही पीडिटेला भेटण्यासाठी आग्रह करू लागले. १९ जून रोजी सर्व जण घटस्फोटाचे कागद पत्र घेऊन पडितेला भेटण्यासाठी गेले. यानंतर त्यांनी तिला सोबत चालण्याचा आग्रह केला. तिला विश्वास बसावा म्हणून त्यांनी तिच्या मित्राला देखील सोबत घेण्यास सांगितले. मात्र, काही अंतरावर गेले असता, त्यांनी पत्नीच्या मित्राला गाडीतून काढून टाकले.

याला विरोध करत गाडीतून बाहेरर पडलेल्या पत्नीला पतीने पीडित पत्नीला जबरदस्तीने ओढत गाडीत बसवले. गाडीत तिला भुलीचे इंजेक्शन देखील देण्यात आले. एक रात्र पिडितेला गाडीत डांबून ठेवण्यात यावे. तसेच ती पळून जाऊ नये यासाठी वेळोवेळी भुलीचे इंजेक्शन देखील तिला देण्यात आले. दरम्यान, पीडितेने पतीसोबत राहण्याचे नाटक केले. दोघेही एका मंदिरात सोबत असतांना तिने मंदिरातील एका स्थानिक तरूणाशी संपर्क साधत पोलिसांची संवाद सांगत तिची आपबीती कथन केली. यानंतर पोलिसांनी धाव घेत पिडीत महिलेशी सुटका केली. या प्रकरणी सासू, पती आणि नातेवाईक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel