Pimpri chinchwad minor criminal murder : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने त्याच्या मित्र असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर आरोपीने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.
चाकण परिसरात सोमवारी रात्री तीन अल्पवयीन मुले दारू पीत बसले होते. यातील दोघे हे अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. दारू पीत असतांना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपीसोबत असलेल्या मुलाला हत्या झालेल्या मुलाने कानाखाली लगावली. या गोष्टीचा राग आल्याने त्यांच्यात वाद झाले. हा वाद टोकाला गेल्याने १७ वर्षीय सराईत गुन्हेगाराने डोक्यात दगड घालून त्याच्या मित्राची हत्या केली.
या घटनेचे चित्रीकरण तिसऱ्याने मोबाईलमध्ये केला. दरम्यान, आरोपीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर ठेवला. हा व्हिडिओ नंतर सोशल मिडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी याची दाखल तातडीने तपास करत आरोपीचा शोध घेऊन दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हत्या झालेल्या अल्पवयीन मुलावर खुणाचे तर हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलांवर पाच ते सहा गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
संबंधित बातम्या