Mumbai Crime News: धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना-in mumbai father sold two year old child for rupees one lakh fifty thousand ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime News: धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना

Mumbai Crime News: धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना

Aug 23, 2024 03:42 PM IST

Mumbai Crime News: मुंबईत एका वडिलांनी स्वत:च्या दोन वर्षांच्या बाळाची उत्तर प्रदेशात विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना
धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना

Mumbai Crime News: राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. या घटनेमुळे मन सुन्न होत असतांना, आणखी एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका वडिलांनी त्यांच्या दोन वर्षांच्या बाळाची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलाला उत्तर प्रदेशात विकल्याचा संशय आहे. ही घटना मुंबईतील ॲन्टॉप हिल येथे घडली असून केवळ दीड लाख रुपयांत मुलाची विक्री केल्याचं उघड झालं आहे.

अनिल पूर्वया असे आरोपीचे नाव आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पित्याने ने पाऊल उचललं आरोपी पित्यासह चौघांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलाच्या आजोबांमुळे ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याच्या मुलाला उत्तर प्रदेशातील एका दाम्पत्याला विकले. मुलाच्या विक्रीतून आरोपीला १ लाख ६० हजार रुपये मिळाले. अॅन्टॉप हिल परिसरातील विजय नगर येथे अमर धीरेन सरदार राहतात. त्यांची मुलगी काजल हिचा आरोपी अनिल पूर्वया याच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी काजलचा मृत्यू झाला. त्यानंतर काजल हिचा मुलगा आरोपी अनिलकडे होता. दरम्यान, आजोबाने नातवाची चौकशी केली. मात्र, अनिलने उडवा उडवीची उत्तरे दिली. नातू त्यांना काही दिवस दिसला नाही. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तब्बल जून महिन्यापासून तक्रारदार आजोबा नातवाची आरोपीकडे चौकशी करत होते. पण,आरोपी अलिनने त्यांना माहिती दिली नाही. त्यांच्या त्यांना संशय बळवल्याने त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना जवळच राहणाऱ्या आस्मा शेख हिच्यामार्फत अनिलने मुलाला विकल्याचे पुढे आले.

या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. अनिलने जुलै महिन्यात घरात कोणालाही न सांगता मुलाला शेख यांच्याकडे नेले. तिने आशा पवार, शरीफ शेख व इतर आरोपींच्या मदतीने मुलाची विक्री उत्तर प्रदेशात केली. या व्यवहारातून अनिलला १ लाख ६० हजार रुपये मिळाले. वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलीसानी या प्रकरणी कारवाई करत दोघांना अटक केली. तसेच दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे,

विभाग