Kolhapur Ganesh : कोल्हापुरात गणरायाचे जल्लोषात आगमन करण्यात आले. अनेक पथकाने डिजेच्या तालावर गणरायाचे स्वागत केले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील उचलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मंडळाने गणेशोत्स आगमन मिरवणुकीत डिजेसोबत एचडी लाईट्स व लेझर लावण्याने या लाइट आणि लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला तर बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस हवालदाराचा डोळा सुजला.
कोल्हापुरात उचलगांव येथे लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोषात व धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. येथील गणेश मंडळाने डिजेचा दणदणाटात गणरायाचे स्वागत केले. दरम्यान, लेझर लाइटचा वापर टाळा असे आवाहन केल्यानंतर देखील काही मंडलांनी मिरवणुकीत मोठे एलईडी लाइट आणि लेझर लाइटवापले. या लाइटांमुळे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. लेझरचा प्रकाश थेट डोळ्यात गेल्याने या तरुणाच्या डोळा लाल होऊन त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. एवढेच नाही तर या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस हवालदाराचा डोळा देखील सुजला. डोळ्यातून पाणी वाहू लागल्यानंतर तरुणाला आणि पोलिसाला शास्त्रीनगरमधील एका एका दवाखानेत भरती करण्यात आले असता, तरुणांच्या बुबुळाला लेझरच्या किरणांमुळे इजा होऊन रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. तर हवालदार युवराज पाटील यांचाही जवा डोळा लाल होऊन सूज आल्याचे कळले.
कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजारामपुरी परिसरातील ५४ पेक्षा जास्त गणेश मंडळं या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. येथील नव्या राजवाड्यातपालखीतून गणरायाचे आगमन झाले. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते या गणरायाचे पूजन करण्यात आले. राजवाड्यात विधिवत श्रींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर याज्ञसेनीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती आणि यशराजराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.