सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार

सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार

Published Nov 04, 2024 08:27 AM IST

sangli tasgaon news: तासगावात चक्क दिवाळी फराळाच्या पाकीटांतून मतदारांना ३ हजार रुपये वाटप झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार
सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार

sangli tasgaon news : राज्यात विधानसभा निवडणुकी जोमात सुरू आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यात दिवाळी असल्याने उमेदवारांनी मतदार राजाला विविध मार्गाने खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या साठी कुणी थेट घरी जात आहे तर कुणी विविध प्रकारे थेट भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका दिवाळी फराळाची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. सांगली येथील तासगाव मतदार संघात मतदारांना चक्क दिवाळी फराळाच्या पाकीटातून तीन हजार रुपयांचे वाटप झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहाकाळ मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून रोहित आर. आर. पाटील निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, दिवाळी निमित्त त्यांचे कार्यकर्ते मतदारांना दिवाळी फराळाचे वात करत होते. यावेळी दिवाळी फराळाच्या पॅकेटमधून ३ हजार रुपयांचे वाटप केल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला. ही घटना तासगाव शहरातील साठेनगर भागात घडली असून रोहित पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या घटनेच्या विरोधात संजयकाका पाटील यांनी गटाने रात्री थेट पोलिसांत धाव घेतली असून आंदोलन सुरू केले आहे.

पोलिसांनी रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं असून त्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटलांच्यासाठी पैसे वाटप केल्याचं कबूल देखील केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी संजयकाका पाटील हे आक्रमक झाले आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या घटनेची माहिती मला कार्यकर्त्यांनी फोनद्वारे दिली असून या प्रकरणी ठोस पुरावा दोन दिवसांत देईन, असे संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे.

रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील लढत

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहाकाळ मतदार संघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या मतदार संघातून निवडणूक रिंगणात उभे आहेत. या दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या