Amravati accident : मेळघाटात भीषण अपघात! कार दुचाकीच्या धडकेत चार जण ठार; होळीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati accident : मेळघाटात भीषण अपघात! कार दुचाकीच्या धडकेत चार जण ठार; होळीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

Amravati accident : मेळघाटात भीषण अपघात! कार दुचाकीच्या धडकेत चार जण ठार; होळीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

Mar 25, 2024 09:19 AM IST

Amravati melghat accident : मेळघाटातील घुटी गावाजवळ रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाले.

मेळघाटातील घुटी गावाजवळ रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाले.
मेळघाटातील घुटी गावाजवळ रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाले.

Amravati melghat Accident : अमरावती जिल्ह्यात रविवारी दरीत बस कोसळून तीन जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना संध्याकाळी मेळघाट येथील घुटी गावाजवळ संध्याकाळी ७ च्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला. या अपघातात ४ एकाच कुटुंबातील चौघे जण ठार झाले आहे. एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झाला. मृतांमध्‍ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादू भब्‍बा दारशिंबे (वय २७, रा. सावऱ्या), दादू याची पत्‍नी शारदा दारशिंबे (वय २४), आणि त्‍यांची दोन लहान मुले अशा चौघांचा या या अपघातात मृत्यू झाला.

JNUSU च्या निवडणुकीत एबीव्हीपीचा सुपडा साफ! डाव्यांनी चारही जागा जिंकल्या

काल होळी होती. होळी आणि धूळवड साजरी करण्यासाठी हे कुटुंब त्यांच्या दुचाकीवरून दुचाकीवरून धारणी शहरात जात होते. येथे होळी सणानिमित्‍त बाजार करण्यासाठी ते आले होते. बाजारातील साहित्‍य खरेदी करून हेत्यांचे मूळ गाव सावऱ्या येथे परत जात होते. यावेळी घुटी गावाजवळ त्यांची दुचाकी आली असता, एका एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दादु भब्बा दारशिबे, शारदा दारशिबे व त्यांची दोन मुले जागीच ठार झाले. या घटनेमुळे सावऱ्या गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

मेळघाटात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यासाठी खरेदी करण्यासाठी मोठी लगबग असते. या ठिकाणी मोठे बाजार लागत असून या बाजरात खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असते. धारणी ही मोठी बाजारपेठे असल्याने दारशिंबे हे त्यांच्या दुचाकीवरून येथून खरेदी करून घरी जात असतांना हा अपघात झाला.

दारशींब यांची दोन बालके दुचाचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसले होते. कारची धडक एवढी जोरदार असल्याने चौघेही दुचाकीवरून दूर फेकल्या गेले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर