इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा; विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूकही लढवणार, मतदारसंघही ठरले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा; विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूकही लढवणार, मतदारसंघही ठरले!

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा; विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूकही लढवणार, मतदारसंघही ठरले!

Oct 17, 2024 07:46 PM IST

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील नांदेड लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक लढवणार आहेत. तसेत छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत.

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel : एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी विधानसभा तसेच लोकसभेची पोटनिवडणूकही लढवण्याची घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेड लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक लढवणार आहेत. तसेत छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. इम्तियाज जलील यांच्यामुळे कोणाला फटका बसणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडची जागा रिक्त झाली आहे. काँग्रेसने येथे वसंतराव यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, त्यांच्यासमोर जलली यांचे आव्हान असणार आहे. 

माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढण्याची संधी असताना मी का प्रयत्न करू नये? मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो, मला पाडण्यासाठी या लोकांनी कशी मेहनत घेतली, हे सर्वांना माहिती आहे. लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी ही लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशी आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यांनी ती इच्छा आमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना बोलून दाखवली आहे.

एमआयएम महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर बी टीम असल्याची टीका होत असते. अनेक वर्षापासून हे आरोप केले जात आहेत. मात्र याला आम्ही महत्व देत नाही.

जलील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट -

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून मनोज जरांगे जलील यांच्याशी युती करणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मराठा समाजाच्या मतांचं गणित साधण्यासाठी जलील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेल्याचं म्हटलं जात आहे. जुले महिन्यात जरांगे पाटील यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या सभेत लाखो मराठा बांधव जमले होते. मराठ्यांची मते मिळवण्यासाठी जलील जरांगे यांच्याशी सूत जुळवत असल्याचं म्हटलं जात आहे. 

२०२४ च्या लोकसभेत काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. अशोक चव्हाण भाजपसोबत असल्यामुळे नांदेडमध्ये भाजप मजबूत स्थितीत होता. त्यानंतरही झालेल्या भाजपचा पराभव महाराष्ट्रभर चर्चेला गेला. दरम्यान, मोठा विजय मिळवल्यानंतर खासदार वसंत चव्हाण यांचे तीन महिन्यानंतर निधन झाले व आता नांदेडमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर