Weather Updates: राज्यातील कमाल तापमानात वाढ; अनेक भागात उन्हाचे चटके जाणवणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यातील कमाल तापमानात वाढ; अनेक भागात उन्हाचे चटके जाणवणार

Weather Updates: राज्यातील कमाल तापमानात वाढ; अनेक भागात उन्हाचे चटके जाणवणार

Mar 08, 2024 07:15 AM IST

Maharashtra weather forecast today: महाराष्ट्रातील कमाल तापमान वाढ होताना दिसत असून अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत.

Maharashtra temperature
Maharashtra temperature

Weather Updates: राज्याच्या हवामानात गेल्या पंधरा दिवसांत वेगाने बदल झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र, आता पुन्हा कमाल तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. राज्यात अनेक भागात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील काही शहरांमध्ये रात्री गारवा आणि दुपारी ऊन अशी परिस्थिती जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ८ मार्च रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमानाची स्थिती काय असू शकते? हे जाणून घेऊयात.

ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम विदर्भापासून कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राज्यातील अनेक भागात आज कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.निफाड येथील गहू संशोधन केंद्रात गुरुवारी ९.० अंश तापमानाची नोंद झाली. तर, वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३८.८अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या पार गेला आहे.

Mumbai Pune express way : वेगाला वेसण! मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वेगमर्यादा ओलांडल्यास थेट २ हजार रुपयांचा दंड

 

गुरुवारी नोंदवण्यात आलेले तापमान

पुणे -३५.० , धुळे- ३५.० , जळगाव- ३४.८ , कोल्हापूर- ३५.४ , महाबळेश्वर- २९.६- , मालेगाव- ३७.८ , नाशिक- ३२ , निफाड- ३२.८ , सांगली- ३६.४ , सातारा- ३४.७ , सोलापूर- ३८.६ , सांताक्रूझ- ३२.२ , डहाणू- २९.३- , रत्नागिरी- ३२.२ , छत्रपती संभाजीनगर- ३४.४ , नांदेड- ३६.२ , परभणी- ३७.६ , अकोला- ३७.५ , अमरावती- ३६.० , बुलढाणा- ३५.४ , ब्रह्मपूरी- ३७.८ , चंद्रपूर- ३७.८ , गडचिरोली- ३५.० , गोंदिया- ३५.२ , नागपूर- ३६.६ , वर्धा- ३७.५ , वाशीम- ३८.८ आणि यवतमाळ ३७.५.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर