Weather Updates: काळजी घ्या! २७ मार्चपर्यंत राज्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: काळजी घ्या! २७ मार्चपर्यंत राज्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार

Weather Updates: काळजी घ्या! २७ मार्चपर्यंत राज्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार

Updated Mar 23, 2024 09:31 AM IST

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात येत्या चार दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

राज्यातील तापमानात पुढील चार दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील तापमानात पुढील चार दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (REUTERS)

Maharashtra Weather Updates: राज्यातून थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली. राज्यातील नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना पुढील चार दिवस तापमान चाळीशी पार जाण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी उन्हाळा जास्त कडक असणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मार्च महिन्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत काल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, आज तापमान ३८.७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुण्यातही अशीच परिस्थिती आहे. पुण्यात आज कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस असेल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या विदर्भातील वातावरणातही बदल होताना दिसत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबला आहे. यामुळे तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भात आज तापमान ३६ ते ३७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे

भारतीय हवामान विभागाने येत्या २६ मार्चपर्यंत देशातील अनेक भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाटासह हलका पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर