मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Updates: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2024 06:16 AM IST

aharashtra Weather Updates: महाराष्ट्रात पुढील २४ तास अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Weather Updates Today
Weather Updates Today (HT)

Weather Updates: महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ८ मार्च २०२३ रोजी हवामानाच्या स्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यात आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा, आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा दाह वाढला आहे. रविवारी संध्याकाळनंतर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रीय असल्याने त्याचा थेट परिणाम शहरातील वातावरणावर दिसत आहे. मुंबईतील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

देशभरात मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. सन १९७१ ते २०२० या कालावधीत देशभरातील मार्चमधील पावसाची सरासरी २९.९ मिलीमीटर आहे. त्यामुळे यंदा मार्चमध्ये सरासरीच्या ११७ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक भागांना रविवारी पावसाने हजेरी लावली. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांमध्ये गारपीट आणि विजांचा कडकडाटही झाला आहे.

IPL_Entry_Point