मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: कोकण, विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज!

Weather Updates: कोकण, विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज!

Jun 29, 2024 07:07 AM IST

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात आज कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. (फोटो - पीटीआय)

Maharashtra Rain: राज्यातील विविध भागात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या दहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुनरागमन केले आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अरबी समुद्रात दगांची दाटी झाली असून राज्यातील पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक १७० मीलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, आज (२९ जून २०२४) रायगड, रत्नागिरी, पुणे या भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यमतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया चंद्रपूर, गडचिरोली येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत इतक्या पावसाची नोंद

कोकण: म्हसळा १४० मिलीमीटर, तळा १४० मिलीमीटर, श्रीवर्धन ११० मिलीमीटर, रामेश्वर ११० मिलीमीटर, उरण ११० मिलीमीटर, मंडणगड १०० मिलीमीटर, सावंतवाडी १० मिलीमीटर, दापोली १० मिलीमीटर, मुरूड १० मिलीमीटर, लांजा १० मिलीमीटर, गुहाघर १० मिलीमीटर, कुडाळ ८० मिलीमीटर, वेंगुर्ला ८० मिलीमीटर, मुलदे ८० मिलीमीटर, वाकवली ८० मिलीमीटर, कुलाबा ८० मिलीमीटर, ठाणे ८० मिलीमीटर, पनवेल ८० मिलीमीटर, मालवण ७० मिलीमीटर, रोहा ७० मिलीमीटर , हर्णे ७० मिलीमीटर, सांताक्रुझ ७० मिलीमीटर, सुधागड पाली ६० मिलीमीटर, संगमेश्वर ६० मिलीमीटर, खेड ६० मिलीमीटर, राजापूर ६० मिलीमीटर, देवगड ६० मिलीमीटर, रत्नागिरी ६० मिलीमीटर, कणकवली ५० मिलीमीटर, दोडामार्ग ५० मिलीमीटर, सावर्डे ५० मिलीमीटर, भिवंडी ५० मिलीमीटर, चिपळूण ५० मिलीमीटर, माथेरान ५० मिलीमीटर, आवळेगाव ५० मिलीमीटर, तलासरी ५० मिलीमीटर, महाड ५० मिलीमीटर, पेण ५० मिलीमीटर.

मध्य महाराष्ट्र:

गगनबावडा ७० मिलीमीटर, पाचोरा ६० मिलीमीटर, राधानगरी ५० मिलीमीटर, महाबळेश्वर ४० मिलीमीटर, इगतपुरी ४० मिलीमीटर, धरणगाव ४० मिलीमीटर, एरंडोल ३० मिलीमीटर, चंदगड ३० मिलीमीटर, जळगाव ३० मिलीमीटर, वेल्हे ३० मिलीमीटर, यावल ३० मिलीमीटर, रावेर ३० मिलीमीटर, नंदूरबार २० मिलीमीटर, शाहूवाडी २० मिलीमीटर, सिंदखेडा २० मिलीमीटर, धुळे २० मिलीमीटर, चाळीसगाव २० मिलीमीटर, चोपडा २० मिलीमीटर.

दिल्लीत जूनमध्ये ८८ वर्षानंतर इतका पाऊस

दिल्लीकरांना शुक्रवारी पावसाने झोडपून काढलेल्या शहराची जागा मिळाली. शहराच्या अनेक भागात पाणी साचले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने वाहने पाण्याखाली गेल्याने किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. गुरुवारपासून दिल्ली, नोएडा आणि गुरुग्रामच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शहरात मुसळधार पाऊस आणि पाणी साचण्यावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक घेतली घेऊन चर्चा केली. उपराज्यपालांनी अधिकाऱ्यांना जलपर्णीअहवाल कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर