Weather Updates: राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. याशिवाय, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे अवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
मध्य महाराष्ट्र: मंडणगड- ७० मिलीमीटर, दोडामार्ग- ५० मिलीमीटर, कुडाळ- ५० मिलीमीटर, आवळेगाव- ४० मिलीमीटर, मुलदे- ४० मिलीमीटर, सावंतवाडी- ४० मिलीमीटर, वैभववाडी- ४० मिलीमीटर, सुधागड पाली- ३० मिलीमीटर, लांजा- ३० मिलीमीटर, राजापूर- ३० मिलीमीटर, संगमेश्वर- ३० मिलीमीटर.
मराठवाडा: औसा- ३० मिलीमीटर, धाराशिव- ३० मिलीमीटर.
विदर्भ: साकोली- ४० मिलीमीटर, नरखेड- ३० मिलीमीटर, बाभूळगाव- ३० मिलीमीटर, नेर- ३० मिलीमीटर, दिग्रस- ३० मिलीमीटर, नागपूर- ३० मिलीमीटर, गोंडपिंपरी- ३० मिलीमीटर, यवतमाळ- ३० मिलीमीटर, दारव्हा- ३० मिलीमीटर, अहेरी- ३० मिलीमीटर.
घाटमाथा: कोयना नवजा- १०० मिलीमीटर, दावडी- ५० मिलिमीटर, शिरगाव- ५० मिलीमीटर, ताम्हणी- ४० मीलिमीटर, कोयना पोफळी- ४० मीलिमीटर.
पुढील पाच दिवसांत उत्तर आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी झालेल्या पावसामुळे विविध भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून सकाळ आणि दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अक्षरधाम, लोदी रोड, नेहरू स्टेडियम, डिफेन्स कॉलनी, लजपत नगर, मालवीय नगर, कालकाजी, तुगलकाबाद, ईस्ट ऑफ कैलास, छत्तरपूर, इग्नू, आयानगर आणि डेरामंडी सह दक्षिण दिल्ली आणि दक्षिण-पूर्व दिल्लीच्या निवडक भागात हलका पाऊस आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या सफदरजंगमध्ये ९.२ मिमी, लोधी रोडमध्ये ७.४ मिमी, रिजमध्ये ५.६ मिमी, पालममध्ये १७.४ मिमी आणि आयानगरमध्ये ४०.८ मिमी पावसाची नोंद झाली.
संबंधित बातम्या