मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यात उकाडा कायम; जळगाव, धुळेसह 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

Weather Updates: राज्यात उकाडा कायम; जळगाव, धुळेसह 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

May 24, 2024 09:13 AM IST

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उष्णतेची लाट येणार आणि कुठे पावसाच्या सरी कोसळणार, हे जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (HT)

Weather News: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर, नाशिक आणि पुणेसह सात जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला. यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अकोल्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांतील सरासरी कमाल तापमान (२२ मेची आकडेवारी केवळ २३ मे रोजीच उपलब्ध होईल) या वर्षी (१९५१ पासून) तीस पैकी केवळ सहा राज्यांमध्ये पहिल्या दहामध्ये आहे. मिझोराम, मणिपूर, आसाम, गुजरात, केरळ आणि राजस्थान या सहा राज्यांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत १ अंश सेल्सिअसने अधिक उष्ण आहे.

महिन्याभरात देशाच्या विविध भागांत उष्णतेने थैमान घातले आहे. उदाहरणार्थ, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्ण असलेली राज्ये एकतर द्वीपकल्पीय राज्ये किंवा पूर्वेकडील राज्ये होती. त्यात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि मिझोराम यांचा समावेश होता. या दहा राज्यांपैकी केवळ बिहार, पश्चिम बंगाल आणि मिझोरामने तिसऱ्या आठवड्यात हा ट्रेंड कायम ठेवला. तिसऱ्या आठवड्यात पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या उत्तरेकडील राज्यांनी ही साथ दिली.

महिना जसजसा पुढे सरकत गेला तसतसा उष्णता देशाच्या दक्षिण भागातून उत्तर भागाकडे सरकली आहे, हे या साप्ताहिक ट्रेंडमधून दिसून येते. कारण मे महिन्याच्या सुरवातीच्या भागात पश्चिम विक्षोभाच्या पावसामुळे आणि ढगांमुळे उत्तर अर्धा भाग थंड होता. पश्चिमी विक्षोभ कमकुवत झाल्याने महिन्याच्या उत्तरार्धात ते तापले आहेत. दुसरीकडे, महिन्याच्या सुरवातीला कोरडवाहू असलेली दक्षिणेकडील राज्ये आता पावसाळी आणि थंड झाली असून आजूबाजूच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४