IMD Weather Report: महाराष्ट्रात देशात सूर्य आग ओकत असून राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा आकडा ४० अंशाच्या घरात आहे. अकोला (४४.०), चंद्रपूर (४३.८), वाशीम (४३.६), जळगाव (४३.२), ब्रह्मपूरी (४३.१), अमरावती (४२.८), धुळे (४२.५), वर्धा (४२.५) आणि यवतमाळ (४२.५) येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यातच हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता नोंदवली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते.
विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र (जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर) मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड लातूर, नांदेड) आणि विदर्भात यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात शनिवारी (२० एप्रिल २०२४) अकोला जिल्ह्यात (४४ अंश सेल्सिअस) सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यातच जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली.
पुणे (३९.५), अहमदनगर (४०.०), धुळे (४२.५), जळगाव (४३.२), कोल्हापूर (३६.६), महाबळेश्वर (३१.६), मालेगाव (४२.०), नाशिक (३९.४), निफाड (३९.२), सांगली (३७.८), सातारा (३९.०), सोलापूर (३८.२), सांताक्रूझ (३४.८), डहाणू (३६.३), रत्नागिरी (३३.८), छत्रपती संभाजीनगर (४०.९), बीड (४१.४), नांदेड (४१.०), परभणी (४२.२), अकोला (४४.०), अमरावती (४२.८), बुलढाणा (४०.६), ब्रह्मपूरी (४३.१), चंद्रपूर (४३.८), गडचिरोली (४१.८), गोंदिया (४१.१), नागपूर (४१.४), वर्धा (४२.५), वाशीम (४३.६) आणि यवतमाळ मध्ये ४२.५ तापमानाची नोंद झाली.
आज महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांचा इशारा देण्यात आला. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडेल. ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये तीव्र उष्णता असेल.