Weather Updates: राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, पुढील चार दिवस काळजीचे!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, पुढील चार दिवस काळजीचे!

Weather Updates: राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, पुढील चार दिवस काळजीचे!

Mar 22, 2024 08:06 AM IST

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात येत्या चार दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

महाराष्ट्रातील तापमानात पुढील चार दिवस वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील तापमानात पुढील चार दिवस वाढ होण्याची शक्यता आहे. (ANI)

Maharashtra Heat Stroke: राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे असल्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात गेल्या दोन-तीन दिवस वादळी वारे आणि गारपीटीमुळे गारवा जाणवत होता. परंतु, आता अनेक भागात पाऊत थांबला असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांना पुढील चार दिवस कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे.

देशातील तापमान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम आसाम हिमालन पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, ओडिशा किनारपट्टी भाग, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये पुढील २४ तासांसाठी बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather update : विदर्भात आजही गारपीटीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट; पुण्यात तापमान होणार वाढ

उष्माघाताची कारणे

राज्यात गेल्यावर्षी अनेकजण उष्णघाताचे बळी ठरले आहेत. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे आणि तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध आल्याने उष्णघात होऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणे

घाम सुटणे, तहान लागणे, थकवा येणे, १०२ सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, अस्वस्थ वाटणे, उलटी सारखा त्रास सुरू होणे इत्यादी उष्णघाताची लक्षणे आहेत. यापैकी कोणतेही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर