मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 10, 2024 10:15 AM IST

India Weather Updates: देशांत आजपासून येत्या १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

(Raj K Raj/HT Photo)
(Raj K Raj/HT Photo) (HT_PRINT)

Todays Weather Report: राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळते आहे. अनेक भागात अजूनही थंडी जाणवत आहे. तर, बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

देशांत आजपासून येत्या १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. याशिवाय, महाराष्ट्रातील काही भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी(१० फेब्रुवारी- ११ फेब्रुवारी) ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आज आणि उद्या म्हणजेच शनिवार आणि रविवार (१० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी) पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

WhatsApp channel