Weather Updates: राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

Weather Updates: राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

Feb 09, 2024 06:18 AM IST

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात पावसाच्या सरी कोसळणार आणि कुठे तापमानात वाढ होणार, हे जाणून घेऊयात.

Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather Updates (HT)

Todays Weather Report: महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तापमान वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, अनेक भागात रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी(१० फेब्रुवारी- ११ फेब्रुवारी) ला ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार (०९ फेब्रुवारी, १० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी) पावसाची शक्यता आहे.

विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोलीत शनिवारी (१० फेब्रुवारी) आणि रविवारी (११ फेब्रुवारी) पावसाच्या हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुबंईसह कोकणात मात्र आकाश निरभ्र राहील, या ठिकाणी थंडी आहे तशीच जाणवेल. पावसाची शक्यता मात्र तिथे जाणवत नाही.

देशातील हवामान

हवामान खात्याने अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर